woman died from Radgad fort balekiila after falling into a valley Pune News
पुणे : पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेकांनी गड किल्ले फिरण्यास सुरुवात केली आहे. मात्र पुण्यातील राजगडावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वेल्हे येथील राजगडावर फिरायला आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पर्यटनासाठी पतीसह आलेल्या या विवाहित महिलेचा 150 फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना राजगडावर काल गुरुवारी (दि.05) घडली आहे. कोमल सतीश शिंदे (वय वर्षे 20) राहणार आळंदी, ता. खेड पुणे असे मृत महिलेचे नाव आहे, याचाबत अधिक माहिती देताना पोलिस म्हणाले, कोमल ही पतीसह राजगडावर पर्यटनासाठी आली होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बालेकिल्ला पाहून झाला होता. त्यानंतर बालेकिल्ल्यावरुन उतरताना ती कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी पोलीस जवान युवराज सोमवंशी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, निलेश जाधव, संदीप सोळसकर, सनी माने, यांनी गडावर धाव घेत स्ट्रेचरच्या साह्याने मृतदेह गडावरून खाली आणला. दुपारी पाऊस पडल्याने गडावरील वाट निसरडी झाली होती. यामुळे मृतदेह खाली आणण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यान रात्री साडेअकराच्या सुमारास वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी कुरणकर यांनी कोमल हिचा उपचारा पूर्वी मृत्यू झाल्याची माहिती दिली. रात्री उशिरा वेल्हे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शिवाजी कुरणकर यांनी महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली असून, याबाबत अधिक तपास वेल्हे पोलिस करत आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा