File Photo : Suicide
नवी दिल्ली – सूरत येथील एका महिलेने मुलाच्या डोळ्यापुढे १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. महिला ज्या ठिकाणी पडली, तिथेच तिचा ८ वर्षीय मुलगा आपल्या मित्रांसोबत खेळत होता. तिचा पती तिच्या चारित्र्यावर संशय करत होता. त्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितले की, आरती (३४) आपल्या ८ वर्षीय मुलाला घेऊन ट्यूशनवरून घरी आली होती. तिने आपल्याला मुलाला त्याची बॅग शेजारच्या मावशीकडे ठेवण्याची सूचना केली. त्यानंतर मुलगा बॅग मावशीकडे ठेवून मित्रांसोबत इमारतीखाली खेळण्यासाठी गेला. तेवढ्यात महिलेने १२ व्या मजल्यावरून उडी मारली. ती जिथे पडली तिथे तिचा मुलगा खेळत होता. मुलाच्या बॅगमध्ये एक सुसाईड नोटही आढळली आहे.