फोटो सौजन्य: iStock
देशात बाईकच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच वाहनांवरील 28 टक्के जीएसटी थेट 18 टक्के झाल्याने ग्राहकांमध्ये बाईक किंवा कार खरेदीदारांमध्ये सकारत्मक वातावरण निर्माण झाले आहे. Hero Splendor Plus ही देशातील सर्वात लोकप्रिय कम्युटर बाईक्सपैकी एक आहे, जी तिच्या विश्वासार्ह परफॉर्मन्स, परवडणारी किंमत आणि उत्तम मायलेजसाठी ओळखली जाते. ही बाईक 97.2 सीसी इंजिनसह येते, जी सुमारे 60-70 Kmpl मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 80 हजार आहे. परंतु, जर तुम्हाला स्प्लेंडर प्लस खरेदी करायची नसेल, तर तुम्ही खालील टॉप 3 बेझंट फ्रेंडली बाईक्सचा विचार करू शकता.
Zelio ई मोबिलिटीने 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केली Next-Gen Gracyi, आता मिळणार जास्त रेंज
बजाज प्लॅटिना 100 ची एक्स-शोरूम किंमत 70,611 रुपये आहे. यात 102 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 7.9 बीएचपी पॉवर आणि 8.34 एनएम टॉर्क जनरेट करते. याचा दावा केलेला मायलेज प्रति लिटर 70 किमी आहे.
बजाज प्लेटिना 100 ही तिच्या साध्या डिझाइनसाठी आणि कमी मेंटेनन्स कॉस्टसाठी ओळखली जाते. यात ComforTec टेक्नॉलॉजीसह उत्तम सस्पेंशन देण्यात आले आहे, जे रायडरला आरामदायी राइडिंग एक्सपिरियन्स देते. Hero Splendorच्या तुलनेत ही अधिक किफायतशीर असून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही चांगला पर्याय ठरते. जर तुम्हाला कमी किंमतीत जास्त मायलेज देणारी बाईक हवी असेल, तर प्लेटिनाचा विचार नक्की करू शकता.
Toyota Kirloskar Motor कडून नवरात्री ऑफरची विशेष घोषणा, ‘ही’ असेल शेवटची तारीख
होंडा शाइन 100 ही Splendor ची सर्वात मोठी स्पर्धक मानली जाते. तिची एक्स-शोरूम किंमत ₹68,994 आहे. या बाईकमध्ये 98.98cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे 7.38 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क निर्माण करते. तिचा मायलेज अंदाजे 65–70 kmpl इतका आहे.
TVS Sport ची सुरुवातीची किंमत 60,000 (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपये आहे. यात 109.7cc सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे Splendor पेक्षा अधिक पॉवरफुल आहे. ही बाईक अंदाजे 70 kmpl (ARAI-claimed) चा मायलेज देऊ शकते.