Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: एप्रिलमध्येच विहिरी सुकल्या, धरणांमध्ये पाणी कमी; एका हंड्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ, पाहा VIDEO

पाणी टंचाईची भीषणता सर्वदूर जाणवू लागली आहे. पाणी आणण्यासाठी महिला दररोज अनेक किलोमीटर चालत जात नाहीत तर स्वतःचा जीवही धोक्यात घालत आहेत. पाण्याच्या एका हंड्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 23, 2025 | 06:25 PM
एप्रिलमध्येच विहिरी सुकल्या, धरणांमध्ये पाणी कमी; एका हंड्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ, पाहा VIDEO (फोटो सौजन्य-X)

एप्रिलमध्येच विहिरी सुकल्या, धरणांमध्ये पाणी कमी; एका हंड्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ, पाहा VIDEO (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Water Crisis: एप्रिल महिना अजून संपलेला नाही आणि महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील लोक पाण्याच्या एका थेंबासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालल असताना पाहायला मिळत आहे. ७० हून अधिक गावांमध्ये विहिरी आणि हातपंप आटले आहेत. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील बोरीची बारीचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला कोरड्या विहिरीत उतरून आपला जीव धोक्यात घालत आहे. महिला कडक उन्हात पाण्यासाठी दररोज २-३ किलोमीटर खडबडीत रस्त्यांवरून चालत जातात. अकोला जिल्ह्यातील उगवा गावात, घराबाहेर ठेवलेल्या टाक्या आणि ड्रमला कुलूप लावलेले आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे स्रोत पूर्णपणे आटले आहेत. चिंतेची बाब म्हणजे मे आणि जूनची तीव्र उष्णता अजून येणे बाकी आहे.

 पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवा प्लॅन; पुणे पालिकेचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन

सरकारी योजना अपयशी ठरली

नाशिकमधील बोरीची बारी येथे चार विहिरी आहेत, त्या सर्व कोरड्या पडल्या आहेत. एका टँकमधील पाणी दोन-चार दिवसांत संपणार आहे. तळाशी राहिलेले पाणी काढण्यासाठी महिला दोरी धरून विहिरीत उतरत आहेत. गावाचे उपसरपंच सोमनाथ निकुळे म्हणाले की, गावातील विहिरी पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या विहिरींमधून फक्त जानेवारी किंवा फेब्रुवारीपर्यंत पाणी उपलब्ध असते. स्थानिकांना पाणी आणण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर चालावे लागते आणि जे तेवढे दूर जाऊ शकत नाहीत त्यांना २०० लिटरच्या बॅरलसाठी ६० रुपये मोजावे लागतात. त्यांनी सांगितले की, ‘जल जीवन मिशन’ या सरकारी योजनेअंतर्गत काम सुरू झाले होते, परंतु ते मध्येच थांबले. आता त्यांच्याकडे पाणी विकत घेण्याशिवाय किंवा जीव धोक्यात घालण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

#WATCH | Maharashtra: Women face hardships to get water for their daily use amid the water crisis in the Tondwal village in Nashik pic.twitter.com/U7lOQrjjeD — ANI (@ANI) April 22, 2025

अनेक जलाशयेही कोरडे पडण्याच्या मार्गावर

मे आणि जून हे महिने अजून शिल्लक आहेत आणि मार्चमध्ये महाराष्ट्रातील ३२ प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी १८ टक्क्यांनी कमी झाली होती. केंद्रीय जल आयोगाच्या आकडेवारीनुसार, या जलसाठ्यांमध्ये फक्त ३२.१० टक्के पाणी शिल्लक आहे. हे राष्ट्रीय सरासरी ३६.१६ टक्के आणि गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या पातळीपेक्षा खूपच कमी आहे. ३२ पैकी २० धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. सुमारे १० टक्के जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर पोहोचले आहेत. सोलापूरमधील उजनी धरणात त्याच्या क्षमतेच्या फक्त १.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यातील लोकांसाठी काही दिलासादायक बातमी आहे, कारण माणिकडोह आणि घोड धरणांमध्ये अजूनही ६०.९२% पाणीसाठा शिल्लक आहे.

‘हर घर जल’ का फायदा लेती भारत की जनता महाराष्ट्र की सरकार ने जनता को तंदरुस्त रखने के लिए ये स्कीम लॉन्च की है. स्कीम के फायदे👇
• इससे महिलाएं सशक्त बनेंगी
• कुएं में उतरकर पानी ढोने से उनकी कसरत होगी
• गंदा पानी पीने से जनता में इम्यूनिटी बढ़ेगी
• लोगों का दिन कट जाएगा pic.twitter.com/BTsBAHUHgb
— Ranvijay Singh (@ranvijaylive) April 20, 2025

Navi Mumbai: नवी मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध, एकनाथ शिंदे यांची निर्धार मेळाव्यात ग्वाही

Web Title: Women climb down dried up well to get water for daily use heavy crisis in nashik maharashtra watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik
  • water

संबंधित बातम्या

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
1

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका
2

Shivsena : “होमवर्क न केलेल्या मुलांचे अर्धवट वर्कशॉप”, आदित्य आणि अमित ठाकरेंवर शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांची घणाघाती टीका

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक
3

Chikhaldara Skywalk : मे पर्यंत पूर्ण होणार स्कायवॉक! आता पर्यटकांसाठी नवे थरार; देशातील पहिला काचेचा स्कायवॉक

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी
4

Ladki Bahin Yojana : धक्कादायक! ‘लाडक्या बहिणीं’चे संकेतस्थळ बंद, ग्रामीण भागात अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.