पुणे महानगरपालिका 274 ठिकाणी करणार सुरक्षेचे उपाय (फोटो- टीम नवराष्ट्र)
पुणे : शहराच्या ईशान्य भागातील वाढती वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पुणे महापालिकेने विमानतळ क्षेत्र एकात्मता आराखड्यासह नगर रस्त्याचा सर्वंकष मोबिलिटी प्लॅन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेगाने विकसित होत असलेल्या भागाला भेडसावणाऱ्या तीव्र रहदारीच्या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी महापालिका सल्लागार नेमणार आहे.
खासगी वाहनांची झपाट्याने होणारी वाढ, शहरी भागाचा विस्तार आणि अपुऱ्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमुळे पुण्यातील वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या ईशान्य भागात, ज्यात नगर रोड, विश्रांतवाडी, विमान नगर, पुणे विमानतळ परिसर आणि वाघोलीचा समावेश आहे. या सर्व भागात अलीकडील काही वर्षांत निवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक आस्थापनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विमानतळ परिसर शहराचे महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून काम करतो, तर नगर रोड दक्षिणेकडील महत्त्वाच्या आयटी झोन आणि ईशान्येकडील विस्तारित उपनगरांना जोडतो. मात्र, समन्वयाचा अभाव वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे विशेषत: गर्दीच्या वेळी ट्रॅफिक जॅम असते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी महापालिकेने सदलबाबा चौक आणि शास्त्रीनगर चौक, असे दोन उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर प्रस्तावित केले आहेत. त्याशिवाय वनाज-रामवाडी मेट्रो मार्ग वाघोलीपर्यंत वाढविण्यात आला आहे. महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडने (एमएसआयडीसीएल) विमा
दोन निविदा आल्या
नगर रस्त्याचा मोबिलिटी प्लॅन तयार करणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. त्यासाठी
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यात अपघाताची मोठी घटना घडली आहे. डेक्कन परिसरातील घोले रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रेणुकदास नारायण जोशी (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी मोटारचालकावर गु्न्हा नोंद केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश जावळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार रेणुकदास जोशी १५ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाशीची राणी चौकातून घोले रस्त्याकडे निघाले होते. झाशीची राणी चौकातील कोपऱ्यावर कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात जोशी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.