Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! ‘या’ दोघी लढवणार निवडणूक

माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तसेच माजी नगसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी पुण्याच्या विशेष 'मोक्का' न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 11:55 AM
वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! 'या' दोघी लढवणार निवडणूक

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! 'या' दोघी लढवणार निवडणूक

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षाची जोरदार तयारी
  • आंदेकर कुटूंबातील दोघी निवडणूक लढणार
  • न्यायालयाकडून ‘ग्रीन सिग्नल’
पुणे : नातवाच्या खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात बंडू आंदेकरची भावजय व माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तसेच माजी नगसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यासाठी पुण्याच्या विशेष ‘मोक्का’ न्यायालयाने हिरवा कंदील दर्शविला आहे. ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,’ असे नमूद करत विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी कोणताही प्रतिबंध नसल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात अटक आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष याचा ५ सप्टेंबर रोजी नाना पेठेत गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३६, तिघे रा. नाना पेठ) यांच्यासह पंधरा आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्याची परवानगी मागण्यासाठी बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी अ‍ॅड. मिथुन चव्हाण यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला.

लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. मिथुन चव्हाण यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना नियमानुसार निवडणूक लढविण्यास परवानगी दिली. निवडणुकीसाठी नामांकनपत्र सादर करण्यासह त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी आरोपींनी आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताच्या मागणीसाठी अर्ज करावा, त्यावर परिस्थिती विचारात घेऊन आदेश दिले जातील, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे.

वनराज आंदेकर खून

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर याचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमा गायकवाड, गणेश कोमकर आणि इतर आरोपींचा समावेश होता. वनराज आंदेकरच्या अंत्यविधीवेळी आंदेकर टोळीच्या सदस्यांनी शस्त्रपूजन करून खुनाचा बदला घेण्याची शपथ घेतल्याची माहिती आहे. ही बाब शहर पोलिस दल तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना माहीत होती. त्यानुसार, वनराज आंदेकरच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत असताना आंदेकर टोळीने भारती विद्यापीठ परिसरात खुनाचा कट रचला होता. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो कट उधळून लावण्यात आला. परंतु नाना पेठेत झालेला कट पोलिसांना रोखता आला नाही आणि त्यात १८ वर्षीय आयुष कोमकर बळी ठरला. गेल्या काही दिवसाखाली आयुषचा खून केला आहे. या खूनानंतर आंदेकर टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que:

    Ans:

Web Title: Women from the andekar family will participate in the pune municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • maharashtra
  • pune news
  • Vanraj Andekar

संबंधित बातम्या

Pune News: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाची नांदी
1

Pune News: युवा कलाकारांच्या सादरीकरणाने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाची नांदी

Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर
2

Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई
3

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

“PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना…”; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता
4

“PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना…”; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.