Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : गॅस दरवाढ, तुटवड्याविरोधात महिला आक्रमक! शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राज्यातील गॅस तुटवडा व दरवाढीविरोधात Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 21, 2026 | 04:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वाढता तुटवडा तसेच दरवाढीच्या पार्श्वभूमीवर Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) महिला आघाडी आक्रमक झाली आहे. यासंदर्भात तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

पिंपरी-चिंचवडमध्ये 8745 कुटुंबांचे ‘घरकुल’ स्वप्न होणार पूर्ण; ‘पीएम’ आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू

सणासुदीच्या काळात, विशेषतः गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा गंभीर तुटवडा निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेवर ओटीपी न मिळणे, बुकिंग प्रक्रिया सुरळीत न चालणे यामुळे नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्याचबरोबर अधिकृत मार्गाने गॅस उपलब्ध नसताना अतिरिक्त दोन ते अडीच हजार रुपये दिल्यास सिलिंडर सहज मिळत असल्याचे प्रकार समोर येत असून, मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचेही नमूद करण्यात आले.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आलेली ६० रुपयांची वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम मागणी महिला आघाडीने केली आहे. तसेच व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळ आणि लघुउद्योजकांवर गंभीर परिणाम झाला असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

पिंक रिक्षा योजनेत 400 कोटींचा घोटाळा, अनेक महिलांची फसवणूक; बाबा कांबळेंचा आरोप

यावेळी अनिता जाधव, भावना पाटील, स्मिता वराडे, अर्चना शेळके, सुनंदा खरात, रत्ना शेळके, पूजा शिंगणे, रोशनी गरड, अश्विनीत फदाट, आम्रपाली कंकाळ, शालिनी जाधव, शितल सुरडकर, वंदना मेढे, कविता पवार, नितात चव्हाण, वैशाली मिसाळ, सुनिता सुरडकर, सुवर्णा जाधव, सविता राऊत, सुनिता दराखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या. महिला आघाडीने सरकारकडे गॅस पुरवठा सुरळीत करणे, बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे, व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्ववत करणे तसेच बाधित व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: Women turn aggressive against gas price hikes and shortages buldhana news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.