Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरळी हिट अँड रनप्रकरणी मोठी अपडेट; शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल

मुंबईतील वरळीतील मासळी बाजारात मासे आणण्यासाठी निघालेल्या एका कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 07, 2024 | 11:18 AM
Photo credit : Social media

Photo credit : Social media

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील वरळीतील हिट अँड रन  प्रकरणात  शिंदे गटाचे उपनेते  राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश शहा यांच्या मुलगा मिहीर शहा यांच्या मुलाकडून हा प्रकार घडला आहे.  मुलगा फरार असल्याने पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे.  अपघात झाला तेव्हा गाडीमध्ये मिहीर आणि त्यांचा  ड्रायव्हर  गाडीत असल्याची माहिती समोर आली आहे.

राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत.  वरळीत पहाटे हा अपघात झाला त्यावेळी  पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर हे दोघे गाडीत होते.

दरम्यान, मुंबईतील वरळीतील मासळी बाजारात मासे आणण्यासाठी निघालेल्या एका कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाचच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात  महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर  अपघातानंतर चालक घटनास्थळावरुन फरार आहे.  वरळी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

वरळीत अॅट्रिया मॉलजवळील वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य आज पहाटे साडेपाचच्या सुमारास माशांच्या घेण्यासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले.  मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना  एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे  असल्याने महिलेच्या पतीचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. महिलेच्या पतीने  बोनेटवरुन बाजूला उडी मारली. पण महिलेला स्वतःला बाजूला होता आलं नाही.

पण  अचानक झालेल्या या प्रकारामुळे चारचाकी वाहनचालक चांगलाच घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. यात त्याने बोनेटवर पडलेल्या कोळी महिलेलाही फरफटत नेले. या अपघातात पती बचावले मात्र  महिलेल्या रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. चारचाकी खाली आल्याने महिलेचा चिरडून मृत्यू झाला. पण या प्रकारानंतर चारचाकीचा मालक फरार आहे. वरळी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Worli hit and run a case has been registered against the son of the deputy leader of the shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • Hit and Run
  • maharashtra news
  • Mumbai crime news
  • palghar
  • Shinde group

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
4

अल्पवयीन मुलींच्या जबरदस्ती विवाह-विक्री प्रकरणाने उडाली खळबळ! सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.