हापूस आंब्यांपासून घरच्या घरी बनवा थंडगार मँगो मस्तानी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं हापूस आंबा खायला खूप आवडतो. हापूस आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय आंब्यामध्ये असलेले घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. फळांचा राजा म्हणून सगळीकडे हापूस आंब्याची ओळख आहे. कोकणातील हापूस आंबा जगभरात सगळीकडेच प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याचा सीजन चालू झाल्यानंतर सगळीकडे पिकलेल्या आंब्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मँगो लस्सी, आमरस, मोदक, पुरणपोळी, सांज्याची पोळी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला पुण्यात प्रसिद्ध असलेली मँगो मस्तानी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवावी, याची रेसिपी सांगणार आहोत. हापूस आंब्यांपासून बनवलेली मँगो मस्तानी खाण्यासाठी लांबून लांबून लोक पुण्यात जातात. मँगो मस्तानी म्हणजे हापूस आंब्यांपासून घट्टसर शेक. चला तर जाणून घेऊया मँगो मस्तानी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
पोटाला थंडावा देण्यासाठी घरी बनवा सातूच्या पीठाचे थंडगार ताक! शरीरारात कायम टिकून राहील ऊर्जा