मुरुडमध्ये पार्किंगसाठी जादा पैसे मोजावे लागणार
Raigad News In Marathi: मुरुड हे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, कारण येथे समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्य सौंदर्य यांचा संगम आहे. मुरुडचा मुख्य आकर्षण म्हणजे मुरुड-जंजिरा किल्ला, जो अरबी समुद्राच्या मधोमध स्थित आहे. या किल्ल्याचा इतिहास, समुद्रकिनारी वेळ घालवणे, आणि जलक्रीडा यांचा आनंद घेता येतो. मुरुडचा समुद्रकिनारा (मुरुड बीच) नयनरम्य आहे, आणि येथे जलक्रीडा, पॅराग्लायडिंग आणि सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेता येतो. मात्र आता मुरुड नगरपरिषद ही क वर्गातील असून मुरुड शहराची लोकसंख्या ही सुमारे 12 हजारच्या आसपास आहे. अनेक वर्ष येथे प्रशासक राजवट असून स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी विविध कामासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने येथील विकासाची कामे मार्गी लागली.
मुरुड शहराच्या अगदी जवळ असणारे समुद्र किनारी 143.50 मीटर लांबी व 18.50 मीटर रुंदी असणारे मोठे वाहन तळ निर्माण केले गेले आहे.पर्यटकांच्या गाड्या व अवजड वाहने येथे पार्क केली जात होती.ती सुधा मोफत परंतु आता नगरपरिषदेने सदरचा ठेका पेण येथे राहणारे मयूर महादू लाडगे यांना हा ठेका मंजूर करण्यात आला आहे.
तीन वर्षाच्या मुदतीसाठी हा ठेका असून 4 लाख 5 हजार रुपये प्रत्येक वर्षासाठी आकारले जाणार आहेत.तीन वर्षाला 12 लाख 15 हजार रुपये भरावे लागणार आहेत.सदरचे टेंडर 8 मे रोजी मंजूर होऊन याचा कार्यभार सुधा ठेकेदारास सुपूर्द करण्यात आल्याची माहिती मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.येथे गाडी पार्क करण्यासाठी चारचाकी छोटे वाहन तीन तासासाठी 50 रुपये तर मोठे वाहन साठी 100 रुपये आकारण्याची परवानगी ठेकेदारास नगरपरिषद मार्फत देण्यात आली आहे.
दुसरे महत्वाचे टेंडर पर्यावरण व वाहन प्रवेशकर स्वच्छता फी मुरुड शहरात येणाऱ्या पर्यटक यांच्या गाडी ठराविक फी आकारली जाते.सदरचा ठेका एम. डी. पी.ग्रुप्स कंपनीला मंजूर करण्यात आला आहे.या ग्रुप च्या मालक अलिबाग येथील पूर्वा मनोज पाटील असून त्यांना हा ठेका तीन वर्षाच्या मुदतीसाठी देण्यात आला आहे.यासाठी आठ लाख रुपये बँक गॅरंटी घेण्यात आली असून वर्षाल 28 लाख रुपयेने हा ठेका मंजूर करण्यात आला आहे.द्वितीय व तृतीय वर्षी 7 टक्के दराने या ठेक्यात वृद्धी करण्यात आली आहे.सदरील दोन महत्वाचे टेंडर वितरीत करण्यात आले असून शासकीय प्रणालीनुसार कामकाज केल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी दिली आहे.