
Young man dies while breaking the lock on a DP box Pune Crime News
सदर घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. डीपी बॉक्सला लावलेले कुलूप तरुणाने का तोडले, यामागचे कारण समजू शकले नाही. मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हा प्रकार कैद झाला आहे. शनिवारी (दि.07 फेब्रुवारी) रोजी सकाळी ही घटना घडली आली.‘मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात नोंद केला आहे.
तो फिरस्ता असून, या भागातील पदपथावर राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.
हे देखील वाचा : ‘पूर्ण मोफत उपचार’ निर्णयाबाबत Health Department चा यू-टर्न? वैद्यकीय सेवांसाठी पुन्हा शुल्क…
पोलिसांच्या माहितीनुसार, मित्रमंडळ चौकात महापालिकेच्या रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस पदपथावर महावितरणचा डीपी बॉक्स आहे. त्याला कुलूप लावलेले होते. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास अनोळखी तरुण डीपी बॉक्सचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने कुलूप तोडले. उच्चक्षमतेच्या वीज वाहिनाला स्पर्श झाल्यानंतर स्फोट झाला. तरुण बाजूला फेकला गेला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
हे देखील वाचा : पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…
तरुणाचा खुनाचा प्रयत्न- फरार गुंड अटकेत
पुणे, वैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. विशाल बाळासाहेब कांबळे (वय २७, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सरइताचे नाव आहे. धनकवडीत २५ ऑक्टोबर रोजी वैमनस्यातून एका तरुणावर कांबळेने कोयत्याने वार केले होते. या घटनेत तरुण जखमी झाला होता.
या प्रकरणी कांबळे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. तो लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल पवार आणिअभिमान बागलाने यांना मिळाली. पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपेश जाधव, उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापू खुटवड, हवालदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर यांनी ही कारवाई केली.