Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे ‘दीप’ आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीत अजित पवार यांची प्रेरणा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 07:54 AM
तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे 'दीप' आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

तुमचे विचार पुढील मार्ग उजळवणारे 'दीप' आहेत; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण पोस्ट

Follow Us
Follow Us:

बारामती / अमोल तोरणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला दोन महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी व विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमध्ये त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

“काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित पवार यांचे लोकाभिमुख व विकासाभिमुख नेतृत्व, सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा आणि कामासाठीची झपाटलेली वृत्ती यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या प्रत्येक निर्णयामागील दूरदृष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, “तुम्ही केवळ एक नेते नव्हता, तर असंख्य लोकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होता.” त्यांच्या नेतृत्वामुळे अनेकांना दिशा व संधी मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीत अजित पवार यांची प्रेरणा कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “लोककल्याणासाठी निर्णय घेताना या परिस्थितीत तुम्ही काय केले असते, हा विचार मनात ठेवूनच मी प्रत्येक पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते,” असे त्यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, ही खंत व्यक्त करत त्यांनी त्यांच्या विचारांनाच पुढील मार्गाचा दीपस्तंभ मानले आहे. त्यांच्या आठवणी, संवाद आणि शिकवण यांच्याच बळावर पुढील वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या भावनिक पोस्टमुळे कार्यकर्त्यांमध्येही भावना दाटून आल्या असून, सोशल मीडियावर अनेकांनी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याला सलाम केला आहे.

बारामतीकरांनी केले अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाले आहेत. बारामती विमानतळापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी अजितदादांचा अपघात झाला होता, त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांसह अजितदादांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी जाऊन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजितदादांच्या स्मृतीस्थळावर जाऊन देखील अनेकांनी अभिवादन केले.

बारामतीकरांनी अजितदादांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन

नटराज नाट्य कला मंडळातील अजितदादांच्या अर्ध पुतळ्याला देखील बारामतीकरांनी अभिवादन केले. या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांच्या पुढाकाराने अजितदादांच्या स्मृती प्रित्यर्थ अजितदादांचे आवडते गायक किशोरकुमार यांच्या गाण्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध गायक हिम्मतकुमार पांड्या हे सायंकाळी सादर करणार आहेत.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : “निरोप समारंभाच्या फोटोत तुम्ही हवे होता…; अमोल मिटकरींची अजित पवारांसाठी भावूक पोस्ट

Web Title: Your thoughts are lamps that illuminate the path ahead sunetra pawar heartfelt post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • ajit pawar
  • political news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
1

‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान
2

‘आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अमित शाह नसतील’; ‘या’ खासदाराने केलं मोठं विधान

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही
3

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

ममता बॅनर्जींना धक्का ! बँक खात्यांबाबत ईडीने दिलेला ‘तो’ आदेश कायम; हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.