Pune News : पोहायला जाणाऱ्या मुलांवर ठेवा लक्ष; शिंदेवस्तीतील कॅनलमध्ये तरुण वाहत्या पाण्यात बेपत्ता
पुण्यामधील हडपसरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. शिंदेवस्तीतील कॅनलमध्ये अंघोळीसाठी गेलेला तरुण वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
हडपसर : वाढत्या उन्हाळ्यामुळे मुलांची पाऊले पोहण्याकडे वळाली आहेत. शहरी भागांमध्ये असणाऱ्या कॅनलमध्ये मुले पोहण्यासाठी किंवा अंघोळीसाठी जात आहेत. मात्र पुण्यामधील हडपसरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. शिंदेवस्तीतील कॅनलमध्ये अंघोळीसाठी गेलेला तरुण वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. कॅनलमधील बेपत्ता वाहून गेलेल्या तरुणाचा वानवडी पोलीस व फायर ब्रिगेड जवानांनी दोन ते तीन तास शोध घेतला. जवानांच्या शोधकार्यानंतर देखील या मुलाचा काहीच पत्ता लागलेला नाही. कोणत्याही प्रकारची डेडबाॅडी देखील मिळालेली नाही.
हडपसर इंडस्ट्रीयल मधील शिंदेवस्तीतील शुक्रवारी (दि.11) सकाळी दहाच्या सुमारास वाहत्या कॅनालमध्ये एक तरुण अंघोळ करण्याठी पाण्यात उडी टाकली. त्यानंतर तो पोहत वर आला आणि परत दुसरी उडी कॅनालमध्ये टाकली त्यानंतर तरुण वर आलाच नाही. स्थानिक नागरिकांनी आरडाओरड केली. तो पाण्यात डुबलेला एक हात वर केलेला कॅनालवरील नागरिकांनी पाहिला. त्यानंतर पाण्यात दिसेनासा झाला. स्थानिक नागरिकांनी लागलीच याची माहिती वानवडी पोलीस स्टेशनला व अग्निशमन दलास माहिती देण्यात आली.
वानवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास शिंदे व त्यांचा स्टाफ घटनास्थळी येऊन पाहणी केली. अग्निशमन दलाचे जवानांनी कॅनालमधील पाण्यात लोखंडी गळ,ॲन्कर दोरी टाकून दोन अडीच तास शोध घेतला. परंतू तरी देखील बेपत्ता झालेला तो तरुण मिळून आला नाही. कॅनलमध्ये वाहून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा वानवडी पोलीस शोध घेण्याचे बराच वेळ प्रयत्न शोध घेत करत होते. परंतु तरुण मिळाला नाही. कॅनाल मध्ये बेपत्ता वाहून गेलेल्या तरुणाचे नाव दिलीप संपत गोफणे (वय ३७ रा. मुळगाव पिंपळगाव उंट, मेहकर बुलढाणा) सध्या शिंदेवस्तीत एका भाड्याच्या घरात राहाण्यास होता. तो गवंडी काम करत असून त्याला दारूचे व्यसन होते. असे देखील तेथील रहिवासी नागरिकांनी सांगितले आहे.
शिंदेवस्तीतील मधील कॅनलला संरक्षक जाळी, भिंत नाही. महिला व लहानथोर येथील कॅनालमध्ये कपडे धुणे,अंघोळीसाठी वापर करतात, शिंदेवस्तीतील नळाला पाणी येत नसल्याने वस्ती मधील नागरिक पोहायला येत नसले तरी अंघोळ करण्यासाठी घरात पाणी नसल्याने कॅनलचा आसरा घेतात, अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी गेलेल्यांचा आतापर्यंत अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. नळाला पाणी येत नसेल,कॅनालला संरक्षक भिंत, जाळी नसेल आणि कॅनालमध्ये बुडून नागरिक मृत्यू पावत असेल तर यास नेमकं कोणास जबाबदार धरायचे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
Web Title: Youth goes missing in flowing water in canal at shindevasti in hadapsar pune