Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे शहरात झिकाचा धोका वाढला; रुग्णांची संख्या 12 वर

पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. पुणे शहरात झिकाचे आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. झिका रुग्णांची एकूण संख्या १२ वर पोचली आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 08, 2024 | 10:31 AM
पुणे शहरात झिकाचा धोका वाढला; रुग्णांची संख्या 12 वर
Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिस वाढत आहे. पुणे शहरात झिकाचे आणखी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये इन्शुरन्स डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या ४२ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, खराडी येथील एका २२ वर्षीय तरुणाचाही अहवाल शनिवारी उशिरा पॉझिटिव्ह आला असून, शहरातील झिका रुग्णांची एकूण संख्या १२ वर पोचली आहे. यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

महिलेला एक ते दीड आठवड्यापासून व्हायरल फिवर सारखा त्रास वाटत होता, एक दिवस फिवर बरोबर रॅश आल्याने संबंधित रुग्णालयाच्या फिजिशियनने जी का व्हायरसचे सॅम्पल एन आय व्ही ला पाठवले असता ते पॉझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये रक्ताची चाचणी निगेटिव्ह आणि युरीन रिपोर्ट पॉझिटिव आहे. ४२ वर्षाची सदर महिला (गरोदर नसून) आता बरी झाली असून घरी आहे. सदर महिलेची सर्व ट्रीटमेंट ओपीडी बेसिस वर करण्यात आली आहे .तिच्या राहत्या भागात व हॉस्पिटलमध्ये केवळ एक किलोमीटरचे अंतर असून सदर भागामध्ये कीटकशास्त्रीय व इतर उपाययोजना चालू करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

पुणे महानगरपालिकेच्या कोद्रे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या खराडी गावातील एका बावीस वर्षे मुलाला एक दिवस ताप व रॅश आल्याने त्याचे सॅम्पल पाठवण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह आले आहे. सदर भाग येरवडा नगर रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत असल्याने या ठिकाणी संबंधित परिमंडळ वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाद्वारे प्रतिबंधात्मक उपायोजना राबवण्यात येणार आहेत.

झिका विषाणूचा गर्भावर काय परिणाम होतो?

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, झिका व्हायरस टाळण्यासाठी गरोदर स्त्रियांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण याचा सर्वाधिक धोका गर्भावर होतो. त्यामुळे गरोदरपणात जर झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास, बाळाचा मेंदू सामान्यपणे वाढू शकत नाही आणि विकसित होऊ शकत नाही. परिणामी, बाळाचा जन्म मेंदूच्या विकासाशी संबंधित अपंगत्व घेऊन होऊ शकतो, किंवा त्याचे डोके लहान असू शकते, तसेच बाळामध्ये ऐकणे, शिकणे आणि वागण्यात देखील समस्या असू शकतात. पहिल्या तिमाहीत झिका संसर्ग झाल्यानंतर या समस्यांचा धोका सर्वाधिक असतो. झिका विषाणूचा गर्भधारणेचे प्रमाण घटण्याशी देखील संबंध आहे, असे डॉ. कल्पना बळीवंत म्हणल्या.

Web Title: Zika threat rises in pune city number of patients up to 12 nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2024 | 10:31 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Pune
  • Zika virus

संबंधित बातम्या

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू
1

Karjat News: दीड महिन्यानंतर शिंगढोळ गावात उजेड; स्थानिकांच्या प्रयत्नांतून नवीन रोहित्र बसवून वीजपुरवठा सुरू

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा
2

Matheran News: विकासकामांना मिळणार गती; माथेरानसाठी मोठ्या निधीची आमदार महेंद्र थोरवे यांची घोषणा

Bhiwandi building collapse: 10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी
3

Bhiwandi building collapse: 10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी
4

Gondiya News: संतप्त विद्यार्थ्यांनी रोखली लालपरी! धापेवाडा येथे आंदोलन; वाहतूक विस्कळीत, अतिरिक्त बससेवेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.