झेडपी’चे ८६ लिपीक स्पर्धा परिक्षेत नापास; १५ जणांना मिळणार प्रमोशन लेटर
पुणे विभागीय आयूक्त कार्यालय अंर्तगत मे महीन्यात घेण्यात आलेल्या कार्यालयीन स्पर्धा परिक्षेत सोलापूर झेडपीचे ८६ लिपीक नापास झाले असून १५ जण पास झाले आहेत. याबाबत सामान्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहीती नुसार १०१ कनिष्ठ लिपिक हे वरिष्ठ लिपीकच्या प्रमोशनासाठी स्पर्धा परिक्षेसाठी बसले होते.
सोलापूर : पुणे विभागीय आयूक्त कार्यालय अंर्तगत मे महीन्यात घेण्यात आलेल्या कार्यालयीन स्पर्धा परिक्षेत सोलापूर झेडपीचे ८६ लिपीक नापास झाले असून १५ जण पास झाले आहेत. याबाबत सामान्य प्रशासनाकडून मिळालेल्या माहीती नुसार १०१ कनिष्ठ लिपिक हे वरिष्ठ लिपीकच्या प्रमोशनासाठी स्पर्धा परिक्षेसाठी बसले होते. १७ मे रोजी कार्यालयीन ३ विषयांची परिक्षा घेण्यात आल्या. १०० गुणांच्या परिक्षेत ४५ गुण मिळाल्यास उत्तीर्ण करण्यात येते. यातील १५ जणांना ४५ गुण किंवा त्या पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत तर ८६ लिपीक हे ४५ गुणां पर्यंत पोहचू शकले नाहीत.
उत्तीर्ण झालेल्या लिपीकांना सीईओस्तरावरुन प्रमोशन लेटर लवकरचं देण्यात येणार आहे. २५ जागेसाठी परिक्षा घेण्यात आली यापैकी १० जागा रिक्त राहील्या आहेत. आशी माहीती देण्यात आली आहे. दरम्यान प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक शिक्षक यांना प्रमोशन देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र मुख्याध्यापक पदा वरुन विस्तारधिकारी पदाचे प्रमोशन आदयप देण्यात आले नाही. याबाबत प्राथमिक शिक्षणधिकारी संजय जावीर म्हणाले सीईओ दिलीप स्वामी यांच्याकडे विस्तारधिकारी प्रमोशनाचा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. दोन दिवसात त्यांना प्रमोशन लेटर देण्यात येणार असल्याचे जावीर यांनी सांगितले.
अनेक वर्षे काम केलेल्या कर्मचारी यांना प्रमोशन आस लागून राहीलेली असते. प्रमोशन वेळेत होत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रमोशन जलदरित्या मिळावे यासाठी विविध कर्मचारी संघटनेकडून सातत्याने आवाज उठविण्यात येतो.
२७ ग्रामसेवक कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. कार्यालयीन विभागीय चौकशी त्यांच्यावर सुरु आहे. दफ्तर गहाळ प्रकारण सर्वात मोठे कारण समोर आले आहे. हिशोबाचा तळमेळ लागत नसल्याची तक्रार ग्रामपंचायात सदस्यानी केली आहे. या संदर्भात ग्रामपंचायात डेप्यूटी सीईओ इशाधीन शेळकंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Web Title: Zps 86 clerks fail in competitive exam 15 people will get promotion letter nrdm