Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जुळली गाठ गं’ मालिकेत मोठा ट्विस्ट, कुस्तीच्या आखाड्यात काय रंगणार?

अखेर कुस्तीच्या आखाड्यात धैर्य सावीला प्रेमाची कबुली देणार आहे. आता धैर्य कुस्तीची स्पर्धा आणि पर्यायाने सावीचं मन जिंकू शकेल का? सावी धैर्यचं प्रेम स्विकारेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.   

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 31, 2025 | 12:45 PM
tv serial (फोटो सौजन्य: instagram)

tv serial (फोटो सौजन्य: instagram)

Follow Us
Close
Follow Us:

‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ ही मालिका रोज रात्री ८ ते ९.३० या वेळेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत लवकरच सावी आणि धैर्य यांचं नातं मैत्रीच्या पुढे जाणार आहे. अखेर कुस्तीच्या आखाड्यात धैर्य सावीला प्रेमाची कबुली देणार आहे. सावीच्या मदतीसाठी धैर्य कुस्तीच्या आखाड्यात जीवाची बाजी लढणार आहे. सध्या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरच्या कुस्ती आखाड्यात सुरू आहे.

‘चल भावा सिटीत’फेम अभिनेत्री रेवथी अय्यरचे सिनेसृष्टीत दमदार पदार्पण, चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद

सावी आणि भाऊंसमोर दामिनी मुजुमदार नवं आव्हान ऊभं करते, आणि या आव्हानाला उत्तर देण्यासाठी धैर्य सावीला मदत करतो. शाळेसाठी लागणारी रक्कम ऊभी करण्यासाठी धैर्य कुस्तीच्या स्पर्धा भरवण्याची कल्पना देतो. पण ऐनवेळी दामिनी या स्पर्धेत अडथळे निर्माण करते. अखेर सावीला या अडचणीतून वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून धैर्य स्वतः आखाड्यात उतरतो. आता धैर्य कुस्तीची स्पर्धा आणि पर्यायाने सावीचं मन जिंकू शकेल का? सावी धैर्यचं प्रेम स्विकारेल का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

मालिकेतील धैर्य काय म्हणाला?

मालिकेत धैर्य हे पात्र साकारणारा अभिनेता संकेत निकम मालिकेतील नव्या ट्विस्ट बद्दल म्हणाला की, ”’जुळली गाठ गं’ या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. नुकतंच मालिकेच्यानिमित्ताने मला कोल्हापूरच्या आखाड्यात कुस्ती खेळण्याचं भाग्य लाभलं. मालिकेमुळे कुस्ती हा खेळ देखील मला जवळचा वाटू लागला. पैलवान कुस्तीमध्ये इतका का गुंतून जातो हे समजलं. मी जेव्हा कुस्तीचे सीन करत होतो, तेव्हा फाईट मास्टर आणि वस्ताद यांनी मला खूप मदत केली. जवळपास १०-१२ तास मी मातीत होतो. जे खेळाडू माझ्यासोबत होते, ते माझ्यापेक्षा धिप्पाड होते आणि त्यांना मला हरवायचं होतं. त्यामुळे सुरुवातीला थोडं दडपण आलं, पण मला आत्मविश्वास होता की, मी हे सीन करू शकतो. आखाड्यातील शूटिंग ३ दिवस चाललं आणि मी ते यशस्वीरित्या पूर्ण केलं. हा अनुभव खूप वेगळा आणि मजेशीर होता.आता प्रेक्षकांना धैर्यची एक नवी बाजू पाहायला मिळणार आहे. बरेच प्रेक्षक सोशल मीडियावर विचारतात की सावी आणि धैर्य यांची गाठ कधी जुळणार? तर मालिकेच्या चाहत्यांना मला सांगायला आवडेल की, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच मी सावीसमोर माझ्या प्रेमाची कबुली देणार आहे. त्यामुळे हा खास भाग तुम्ही चुकवू नका.”

चाळिशीनंतर कपूर घराण्याची लेक करतेय बॉलिवूडमध्ये एन्ट्री; पोस्ट शेअर करत म्हणाली….

Web Title: A big twist in the series julli gath gan what will happen in the wrestling arena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • marathi serial update
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

”रोज नवीन वेदना”.. दीपिका कक्कर कॅन्सरच्या उपचारांमुळे भावूक, म्हणाली, ”मनात भीती…”
1

”रोज नवीन वेदना”.. दीपिका कक्कर कॅन्सरच्या उपचारांमुळे भावूक, म्हणाली, ”मनात भीती…”

World TV Day: सामाजिक एकता वाढविण्यात टीव्हीचे योगदान अधिक – व्ही. आर. हेमा – चीफ चॅनेल ऑफिसर,  झी मराठी
2

World TV Day: सामाजिक एकता वाढविण्यात टीव्हीचे योगदान अधिक – व्ही. आर. हेमा – चीफ चॅनेल ऑफिसर, झी मराठी

बाईपण जिंदाबाद! खोट्या आरोपाने उद्ध्वस्त अनुराधा, वेदनेचा प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला
3

बाईपण जिंदाबाद! खोट्या आरोपाने उद्ध्वस्त अनुराधा, वेदनेचा प्रवास प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.