Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिन्ही खान ब्रदर्स एकाच चित्रपटात दिसणार? आमिर खानचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला ‘…तरच लोकांना चित्रपट पाहायला मज्जा येईल’

सलमान, शाहरुख आणि आमिर हे तीनही खानही अद्याप एकत्र एकाही चित्रपटात दिसलेले नाहीत. तीनही खानला एकाच चित्रपटात एकत्र पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर नुकतंच आमिरने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 22, 2025 | 06:30 PM
तिन्ही खान ब्रदर्स एकाच चित्रपटात दिसणार? आमिर खानचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला '...तरच लोकांना चित्रपट पाहायला मज्जा येईल'

तिन्ही खान ब्रदर्स एकाच चित्रपटात दिसणार? आमिर खानचं वक्तव्य चर्चेत; म्हणाला '...तरच लोकांना चित्रपट पाहायला मज्जा येईल'

Follow Us
Close
Follow Us:

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगला तिनही खान ब्रदर्सने जबरदस्त डान्स करत सर्वांचेच लक्ष वेधले. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान हे तिघेही एकाच मंचावर एकत्र नाचले. तिघांनी एकमेकांच्या सिग्नेचर स्टेपही केल्या. डान्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाल्यानंतर तिनही सुपरस्टारने एकत्र चित्रपट करावा, अशी सध्या चर्चा सुरु आहे.

दरम्यान, सलमान आणि आमिरने एकत्र काम केले आहे. त्यासोबतच सलमान आणि शाहरुखनेही एकत्र काम केलं आहे. पण आमिर आणि शाहरुख अद्याप एकत्र दिसलेले नाही. शिवाय हे तीनही खानही एकत्र एका चित्रपटात अद्याप दिसलेले नाहीत. तीनही खानला एकाच चित्रपटात एकत्र पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यावर नुकतंच आमिरने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने एका मुलाखतीत याबद्दल भाष्य केले आहे.

अक्षय कुमार- अर्शद वारसीची हटके कॉमेडी पुन्हा अनुभवायला मिळणार, ‘जॉली एलएलबी ३’ची रिलीज डेट जाहीर

दरम्यान, ‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला की, “मी आजपर्यंत शाहरुखसोबत केव्हा कामच केलेलं नाही. मला त्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल. शिवाय, आम्हाला तिघांनाही एकत्र एकाच चित्रपटामध्ये काम करायला खूप आवडेल. स्क्रीप्ट चांगली असली पाहिजे. आम्ही याबद्दल वरवर चर्चाही केली आहे. पण ते जरा कठीण आहे, कारण तीन अभिनेत्यांचा चित्रपट असणं हे सहसा पाहायला मिळत नाही. पण असं झालं तर आम्हाला तिघांना तर आनंदच होईल. आम्ही कधीच एकत्र काम केलेलं नाही. एक तर आम्हाला काम करताना मजा येईल आणि लोकांनाही पाहायला आवडेल. चित्रपट चांगला बनेल किंवा वाईट बनेल आणि जर वाईट जरी बनला तरी लोकांना आम्हाला स्क्रीनवर एकत्र पाहायला आवडेल.”

‘करेज’साठी संस्कृती बालगुडेने काय विशेष मेहनत घेतली ? भूमिकेसह चित्रपटाबद्दल अभिनेत्री काय म्हणाली…

आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तिघांनाही एकत्र एकाच चित्रपटामध्ये पाहता यावं अशी त्यांच्या चाहत्यांचीही इच्छा आहे. आमिरने याआधी कपिल शर्मा शोमध्येही यावर प्रतिक्रिया दिली होती. “आम्ही तिघेही इतक्या वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतोय, त्यामुळे आम्ही एकाही चित्रपटात एकत्र काम न करणे हे प्रेक्षकांसाठी अन्यायकारक असेल”, असं आमिर खान म्हणाला होता. दरम्यान, आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं तर, १९९४ मध्ये आलेल्या ‘अंदाज अपना अपना’मध्ये सलमान खान आणि आमिर खानने एकत्र काम केलं होतं, तर शाहरुखबरोबर सलमान खाननेदेखील काही चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’, ‘ट्यूबलाइट’, ‘झिरो’, ‘टाइगर ३’सह अन्य काही चित्रपटांत शाहरुख खान आणि सलमान खानने एकत्र काम केले आहेत.

कुणी नाकाचा आकार बदलतात, तर कुणी ओठ; बोटॉक्स सर्जरी नेमकं आहे तरी काय? अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहतेही चकित

Web Title: Aamir khan to team up with shah rukh khan salman khan for 3 hero film we have loosely spoken about it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News
  • Salman Khan
  • Shah Rukh Khan

संबंधित बातम्या

रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक
1

रिक्षाच्या मागे पोस्टर्स, मुंबईच्या रस्त्यांवर धावपळ! सुपरस्टार Aamir Khanचा 1988 सालचा ‘तो’ VIDEO VIRAL;पाहून नेटकरी भावूक

Salman Khan : इतरांपेक्षा हटके सलमान! Industry त इतकं नाव कमावण्यामागचं Secret आलं समोर, ‘भाईजान आणि Script’
2

Salman Khan : इतरांपेक्षा हटके सलमान! Industry त इतकं नाव कमावण्यामागचं Secret आलं समोर, ‘भाईजान आणि Script’

बॉलिवूडचा ‘सुलतान’ स्क्रिप्ट न वाचताच करतो फिल्म साईन? Salman Khan ने स्वतःच केला चित्रपट निवडण्याच्या पद्धतीबाबत खुलासा!
3

बॉलिवूडचा ‘सुलतान’ स्क्रिप्ट न वाचताच करतो फिल्म साईन? Salman Khan ने स्वतःच केला चित्रपट निवडण्याच्या पद्धतीबाबत खुलासा!

UAE मध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालतेय ‘Aakhri Sawal ’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण
4

UAE मध्ये बंदी, जनहित याचिकेनंतरही भारतात धुमाकूळ घालतेय ‘Aakhri Sawal ’, राष्ट्रपती भवनात होणार विशेष प्रक्षेपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.