Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी काम करतो आणि ती आराध्याला…” घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल मन मोकळं केलं

अभिनेता अभिषेक बच्चन सध्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रमोशन दरम्यान अभिषेकने एका मुलाखतीत स्वत: ऐश्वर्याचं कौतुक करत होणाऱ्या चर्चा खोट्या ठरवत पत्नीबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 26, 2024 | 07:45 AM
"मी काम करतो आणि ती आराध्याला..." घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल मन मोकळं केलं

"मी काम करतो आणि ती आराध्याला..." घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच ऐश्वर्या रायबद्दल मन मोकळं केलं

Follow Us
Close
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या ‘आय वॉन्ट टू टॉक’ या चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आहे. चित्रपटामध्ये अभिषेक कॅन्सर आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांची भूमिका साकारतोय. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा अभिषेक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. पण प्रमोशन दरम्यान अभिषेकने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्वत: ऐश्वर्याचं कौतुक करत होणाऱ्या चर्चा खोट्या ठरवत पत्नीबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

‘मंजुम्मेल बॉईज’ फेम अभिनेत्याला अटक, नेमकं काय आहे प्रकरण

‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने त्याचे आईशी, मुलीशी आणि ऐश्वर्याशी असलेल्या नात्यावर भाष्य केलं. मुलाखती दरम्यान अभिनेता म्हणाला की, “माझ्या लहानपणी मला केव्हाच माझ्या आई- वडिलांनी एकटं वाटून दिलं नाही. माझ्या जन्मानंतर आईने अभिनयातून ब्रेक घेतला. कारण, तिला मुलांसोबत वेळ घालवायचा होता. त्यावेळी आमच्यासोबत बाबा केव्हाही नसायचे. पण बाबांची कमतरता आम्हाला केव्हाच आईने भासून दिली नाही.”

त्यानंतर पुढे अभिषेकने ऐश्वर्याचेही आभार मानले. अभिषेक म्हणाला की, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण मला माहित आहे की, ऐश्वर्या घरी मुलगी आराध्यासोबत आहे त्यासाठी मी तिचा खूप आभारी आहे. मला असं वाटतं की, मुलं केव्हाच तुमच्याकडे तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहत नाहीत. ते तुम्हाला नेहमीच पालक म्हणून पाहतात. जसे की, आपल्याकडे आपले आई वडील पाहतात.”

LG इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅंड KCC K-POP स्पर्धा: गायनात अभिप्रिया चक्रबोर्ती आणि नृत्यात दि ट्रेंड विजयी

१९७६ मध्ये अभिषेकचा जन्म झाल्यानंतर अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी स्वत:ला अभिनयापासून दूर केले होते. त्यावेळी त्यांचे वडील अमिताभ बच्चन हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक होते. ऐश्वर्या- अभिषेकचे २००७ मध्ये लग्न झाले होते. अभिषेक आणि ऐश्वर्याला २०११ मध्ये मुलगी आराध्या झाली. नुकताच आराध्याने तिचा १३ वा वाढदिवस आई ऐश्वर्यासोबत साजरा केला. आराध्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी अभिषेक दिसला नव्हता.

आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने फिल्म इंडस्ट्रीत चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ऐश्वर्याने २०१५ मध्ये ‘जज्बा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. गेल्या काही वर्षांत, अभिनेत्री केवळ काही मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे. यामध्ये ‘सरबजीत’, ‘ए दिल है मुश्किल’ आणि ‘फन्ने खान’ सारखे चित्रपट आणि ‘पोनियान सेल्वन’ सारख्या फ्रेंचायझीमध्ये दिसलीये.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कुटुंबियांसह पाहिला ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज- भाग १’, केले चित्रपटाचे भरभरून कौतुक

Web Title: Abhishek bachchan thanks aishwarya bachchan amid divorce rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 07:45 AM

Topics:  

  • Aaradhya Bachchan
  • abhishek bachchan
  • aishwarya rai bachchan
  • Bollywood News

संबंधित बातम्या

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा
1

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं
2

लग्नाआधी ८ महिन्यांची लिव्ह-इन स्टोरी; सैफ-अमृताच्या नात्यामागचं गूढ उलगडलं

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी
3

वरुण धवनच्या घरी कन्या पुजनाचे आयोजन, सोशल मीडियावर शेअर केल्या खास क्षणांच्या आठवणी

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…
4

IND vs PAK Asia Cup 2025 : अभिषेक शर्माने नाही तर बच्चनने देखील पाकची उडवली खिल्ली! म्हणाला – तुम्ही मला पण नाही आऊट करु शकत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.