LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया”) ने कोरियन कल्चरल सेंटर इंडिया (KCC) च्या सहकार्याने, भारत आणि कोरिया यांमधील सांस्कृतिक संबंध बळकट करून तसेच अपवादात्मक प्रतिभा वाढवण्यासाठी महाअंतिम फेरीसह अखिल भारतीय K-POP स्पर्धा 2024 च्या तीसऱ्या आवृत्तीचा पारितोषिक समारंभ पार पडला. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या K-POP बँड LUN8 चे सायंकाळचे सादरीकरण अविस्मरणीय होते. त्यांच्या उत्साही कोरियोग्राफी आणि अती ऊर्जा यांसाठी प्रसिद्ध असलेल्या LUN8 ने फारच सुंदर सादरीकरण केले ज्यामुळे प्रेक्षकांनी उत्साह अनुभवला आणि नृत्य केले, ज्यामुळे चाहत्यांसाठी हा आकर्षक K-POP अनुभव बनला.
विजेते
या उत्साही महाअंतिम फेरीत, कलकत्त्याच्या अभिप्रिया चक्रबोर्तीने गायनामध्ये विजय प्राप्त केला, तर इटानगरच्या दि ट्रेंडने नृत्यामध्ये विजय प्राप्त केला. या प्रतिभासंपन्न कलाकारांनी अंतिम पारितोषिक प्राप्त केले ते म्हणजे – सर्व खर्चासहित कोरियामध्ये जाणारी सहल, जेथे ते K-POP चा महत्वाचा भाग समजून घेतील विविधांगी संस्कृती पाहू शकतील.
LG इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक हाँग जु जॉन विजेत्यांचे अभिनंदन करतांना म्हणाले की, “अखिल भारतीय K-POP स्पर्धा 2024 ची महाअंतिम फेरी म्हणजे प्रतिभा, उत्सुकता आणि समर्पणाचे विलक्षण प्रदर्शन आहे. प्रत्येक सहभागीने या व्यासपीठावर काहीतरी वेगळे आणले आहे आणि त्यांच्या कामगिरीने खऱ्या अर्थाने K-POP चे भाव टिपले आहेत. मी मनापासून दि ट्रेंड आणि अभिप्रिया चक्रबोर्ती यांचे त्यांनी मिळवलेल्या प्राप्तीबद्दल अभिनंदन करतो. त्यांची मेहनत आणि क्रिएटिव्हिटी खरोखर प्रेरणादायी आहे. LG मध्ये,युवा प्रतिभेला साहाय्य करतांना आणि भारत आणि कोरिया यांमधील सांस्कृतिक संबंध बळकट करण्यासाठी आम्हाला अभिमान वाटतो. हा कार्यक्रम आपल्या युवकांची अमर्याद क्षमता आणि संगीत आणि नृत्याची एकत्रित शक्ती यांचा पुरावा आहे.”
कोरियन कल्चरल सेंटर इन इंडियाचे संचालक हाँग इल यंग म्हणाले त्यांचा आनंद व्यक्त करतांना म्हणाले, “भारतीय चाहत्यांनी दिलेल्या उत्साही पाठिंब्याबद्दल धन्यवाद, K-pop ला भरपुरच प्रेम मिळाले आहे, ज्यामुळे आम्ही या महाअंतिम फेरीमध्ये पोहोचू शकलो. पुढच्या वर्षी आमच्या भारतीय चाहत्यांसाठी आणखी एक प्रेक्षणीय रंगमंच घेऊन परत येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
विजेत्यांची निवड परीक्षकांच्या एका प्रतिष्ठित पॅनेलद्वारे करण्यात आली, ज्यामध्ये श्री किम वूक, W KOREA चे CEO, कन्टेंट क्रिएटिव्ह कंपनी, श्री पार्क बाँग-यंग, दि वन मिलियन डान्स स्टुडियोचे कोरियोग्राफर, श्री जू टी युंग, KPOP डान्स युटूबर, श्री किम जिन सू, फँटॅजियो एंटरटेंटमेंट टीमचे प्रमुख यांचा समावेश आहे, ज्यांनी सहभागींच्या कलेची प्रतिभा आणि समर्पण यांबद्दल प्रशंसा केली आहे.
अखिल भारतीय K-POP स्पर्धेसारख्या उपक्रमांद्वारे, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया एक ब्रँड म्हणून आपले स्थान प्रस्थापित करत आहे जो जेन Z शी संबंधित आहे. K-POP सारख्या जागतिक सांस्कृतिक कार्यक्रमांना सेल्फ-एक्सप्रेशनसाठी अर्थपूर्ण व्यासपीठावर एकत्र आणून, LG इलेक्ट्रॉनिक्स इंडिया सातत्याने युवकांना जोडून ठेवणे, जोडून ठेवण्याची आणि संबंधांची भावना निर्माण करणे याची खात्री देते.
या वर्षीच्या स्पर्धेने भारतातील K-POP च्या सतत वाढत्या लोकप्रियतेला बळकटी दिली, ज्यामध्ये संस्कृतींना जोडून ठेवण्यासाठी संगीत आणि नृत्य यांचे शक्तीप्रदर्शन दाखवण्यात आले. महत्त्वाकांक्षी प्रतिभांना व्यासपीठ देऊन, LG इलेक्ट्रॉनिक्स आणि KCC दोन्ही राष्ट्रांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवत युवकांना सातत्याने प्रेरणा आणि प्रगती देत आहे.