Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार…

१५ नोव्हेंबरला 'नाद - द हार्ड लव्ह' हा धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 11, 2024 | 01:50 PM
धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार...

Follow Us
Close
Follow Us:

१५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याचे एक वेगळेच रूप यात आहे.

निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली बनवलेला ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत. दिग्दर्शनाची धुरा प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. आपल्या कल्पक दिग्दर्शन शैलीद्वारे पवार यांनी ‘नाद’मध्ये एक अनोखी प्रेमकहाणी सादर केली आहे. या चित्रपटात उदय आणि शुभ्रा यांची प्रेमकहाणी पाहायला मिळेल. या चित्रपटातील अजिंक्य ही आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे.

हे देखील वाचा – आलिया भट्टने कल्की दिग्दर्शक नाग अश्विनसोबत केली हातमिळवणी, दोघेही मोठ्या प्रोजेक्टसाठी दिसणार एकत्र!

‘नाद’ हा म्हणजे दोन प्रेमी जीवांची आवड पूर्ण करण्याचा प्रवास आहे. या चित्रपटात जरी आजवर कधीही न पाहिलेली लाल मातीतील अ‍ॅक्शनदृश्ये पाहायला मिळतील. सकस कथानकाला मुद्देसूद कथानकाची जोड आणि सहजसुंदर अभिनयाच्या साथीने सादर केलेली प्रेमकथा हे ‘नाद’चं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे संगीतकार पंकज पडघन यांनी गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. ‘डोळ्यांत तूच आहे…’, ‘तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे…’, ‘नादखुळा डान्स करा रे…’ आणि ‘जीवाचे हाल…’ ही चारही गाणी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी येतात आणि मनाला भुरळ घालतात. अर्थपूर्ण शब्दांना सुरेल संगीताची जोड हे या गाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आल्याने पडद्यावर चित्र पाहताना ते सुखावह वाटेल.

हे देखील वाचा – कोण आहे ‘पुष्पा २’ मधील श्रीलीला? अभिनेत्रीची सोशल मीडियावर होतेय चर्चा!

किरण गायकवाडची मुख्य भूमिकेसाठी करण्यात आलेली निवड आणि त्याची सपना माने या नवोदित अभिनेत्रीसोबत जमलेली जोडी चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. किरण गायकवाडसाठी हा चित्रपट इमेज ब्रेकिंग ठरणारा असून, त्याने आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले. ते म्हणाले की, चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी अचूक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. किरणसारखा तगडा अभिनेता मुख्य भूमिकेत असल्याने ‘नाद’ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. त्याला सपनाची सुरेख साथ लाभली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यातील गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर रुंजी घालणारी असून, चित्रपटगृहातून बाहेर पडणारे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण कलाकृती पाहिल्याचा आनंद पाहायला मिळेल अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा – ‘सिंघम अगेन’साठी रोहित शेट्टीने घेतली मोठी रिस्क, अर्जुन कपूर ठरला चित्रपट फ्लॉप होण्यामागचं कारण?

संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. किरण गायकवाड आणि सपना माने यांच्यासह यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांनी केले असून, डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली असून, वेशभूषा निगार शेख यांची आहे. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.

Web Title: Actor kiran gaikwad and sapna mane starrer naad the hard love marathi movie released on theater this 15 november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 01:50 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film

संबंधित बातम्या

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…
1

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज
2

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट
3

Krrish 4: हृतिक रोशन करणार दिग्दर्शन, कधी प्रदर्शित होणार चित्रपट? राकेश रोशनने दिले अपडेट

‘आईने काही शिकवलं नाही…’, तान्या मित्तलच्या आईवर कुनिकाचा हल्लाबोल, नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व मर्यादा पार
4

‘आईने काही शिकवलं नाही…’, तान्या मित्तलच्या आईवर कुनिकाचा हल्लाबोल, नॉमिनेशन टास्कमध्ये सर्व मर्यादा पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.