(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लोकांमध्ये या चित्रपटाविषयी एक वेगळीच क्रेझ होती, जी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिसली नाही. हा चित्रपटप्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांमध्ये या चित्रपटाची खूप उत्सुकता दिसली, तर चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला. तसेच, प्रतिसादानंतर आता कुठेतरी चित्रपट फ्लॉपकडे वाटचाल करत आहे आणि अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अर्जुन कपूरवर प्रश्न उपस्थित होत आहेत? तसेच रोहित शेट्टीने चित्रपटासाठी एवढी मोठी रिस्क घ्यायला नको होती असे त्यांना वाटते आहे.
रोहित शेट्टीने मोठी रिस्क घेतली
वास्तविक, अलीकडेच रोहित शेट्टी बिभू नंदन सिंगच्या पॉडकास्टमध्ये दिसला होता. यावेळी त्यांनी चित्रपटाबाबत अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच जेव्हा रोहितला अर्जुनबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, ‘अर्जुन हा यायचा आणि चित्रपटाची सगळी कथा जाणून घेयायचा अर्जुन मला म्हणाला की मी खलनायकाची भूमिका करू शकतो. जर तुला योग्य वाटत असेल तर मी हे करू शकतो.’ असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात नक्की चाललंय काय? ॲलिसच्या बॉयफ्रेंडला प्रेक्षकांनी केले प्रश्न
रोहितला मोठी रिस्क घ्यावी लागली का?
रोहित म्हणाला की, ‘त्यावेळी मला वाटले होते की अर्जुनला एवढ्या मोठ्या स्टारकास्टसोबत घेणे ही मोठी जोखीम आहे, पण केवळ ट्रोल झाल्यामुळे नकार देणे योग्य नाही. म्हणूनच मला वाटले की अर्जुनला चित्रपटात घेऊ या, जे होईल ते त्याच्यासोबत होईल.’ असे त्यांनी सांगितले. मात्र, आता रोहितची जोखीम त्याच्यासाठी खूपच वाढल्याचे दिसत आहे.
चित्रपटाचे बजेट 350 कोटी रुपये
वास्तविक, ‘सिंघम अगेन’चे बजेटच 350 कोटी रुपये असल्याने सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या कमाईवर नजर टाकली तर चित्रपटाने नुकताच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चित्रपटाची कमाई बघता असे दिसते की चित्रपटाचे बजेट क्वचितच पूर्ण करू शकेल. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या की प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल, परंतु असे काहीही झाले नाही आणि चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घसरण होत आहे.
हे देखील वाचा- मिथुन चक्रवर्ती यांना मिळाली पाकिस्तानमधून धमकी, सलमान-शाहरुखनंतर आणखी एक अभिनेता निशाण्यावर!
‘भूल भुलैया 3’शी टक्कर
‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’ यांच्यातील संघर्षही यामागे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. दोन्ही चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले आणि या संघर्षामुळे दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर परिणाम झाला. चित्रपट फ्लॉप होण्यामागे अर्जुनच कारणीभूत असल्याचेही सांगितले जात आहे.