मुंबई : बॉलिवूडमधील भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला (Actor Salman khan) काही दिवसांपूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मॉर्निंग वॉक करताना सलमान खानचे वडील सलीम खान (Salim khan) यांना बेंचवर पडलेलं एक पत्र सापडलं होते. यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या घटनेनंतर सलमानने स्वसंरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता. (Application for gun license for self defense) तसेच याबाबत त्यांने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयात जाऊन मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. (Mumbai police commissioner) यावेळी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले होते. बंदूक कोणत्या कारणासाठी असं अर्जावर नमूद करावे लागले होते. त्यानंतर सलमानच्या अर्जाची पडताळणी झाली.
[read_also content=”कळंब ग्रामपंचायतीचे नवे आरक्षण जाहीर https://www.navarashtra.com/maharashtra/new-reservation-of-kalamb-gram-panchayat-announced-nrab-310409.html”]
दरम्यान, भाईजान बॉलीवूड अभिनेता सलमान खानला बंदूक ठेवण्याची मुंबई पोलिसांकडून परवानगी दिली आहे. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्याकडे बंदूक ठेवण्याची परवानगी मागितली होती. सलमान आता त्याच्या सुरक्षेसाठी बंदूक ठेवू शकतो असं पोलिसांनी म्हटलं आहे, तसेच सलमानच्या खास माणसांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून बंदूकीच परवाना घेतला आहे. तसेच कोणत्या बंदूकीच परवाना किंवा कोणती बंदू घेऊ शकतो हे मात्र या पावतीवर उल्लेख नाहीय.