Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संकर्षण कऱ्हाडेची मित्रासाठी खास पोस्ट; म्हणाला, “तो कायमच माझ्यासोबत…”

संकर्षणने त्याच्या फिल्मी करियरमध्ये नाटकांच्या प्रयोगांमुळे भरपूर प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. अशातच संकर्षणने त्याच्या एका जिवलग मित्रासाठी फेसबूक पोस्ट शेअर केलेली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 15, 2025 | 05:13 PM
संकर्षण कऱ्हाडेची मित्रासाठी खास पोस्ट; म्हणाला, "तो कायमच माझ्यासोबत…"

संकर्षण कऱ्हाडेची मित्रासाठी खास पोस्ट; म्हणाला, "तो कायमच माझ्यासोबत…"

Follow Us
Follow Us:

लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्याचा अभिनय असो किंवा त्याच्या कविता सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. तो नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसतो. सध्या अभिनेता ‘कुटुंब किर्रतन’, ‘नियम व अटी लागू’ सह वेगवेगळ्या त्याच्या नाटकांच्या माध्यमातून तो चर्चेत असतो. कधी कधी या नाटकांच्या दौऱ्यादरम्यान आलेले गोड तर कधी कटू अनुभव आपल्या पोस्टच्या माध्यमातून अभिनेता शेअर करतो.

संकर्षणने त्याच्या फिल्मी करियरमध्ये नाटकांच्या प्रयोगांमुळे भरपूर प्रवास केला आहे. या प्रवासादरम्यान त्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटत असतात. त्याबद्दल तो आवर्जून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबतचा किस्सा शेअर करत असतो. आता संकर्षणने त्याच्या एका जिवलग मित्राबद्दल खास फेसबूक पोस्ट शेअर केलेली आहे.

“हा कुठला इतिहास आहे?”, आस्ताद काळेच्या ‘छावा’ चित्रपटाबद्दलच्या पोस्ट व्हायरल; केली थेट टीका

मित्राबद्दल शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने लिहिलंय की,

कामाच्या निमित्ताने प्रवास आणि प्रवासाच्या निमित्ताने अनेक माणसं जोडली जातात… २०१६ साली निप्पाणी मध्ये एक कार्यक्रम केला आणि “प्रतीक शहा” नावाचा हा माझ्यापेक्षा वयाने ७/८ वर्षं लहान असलेला दोस्तं जोडला गेला …
मैत्री जपावी कशी ह्याचं उत्तम उदाहरण प्रतीक…
आमच्या पहिल्या भेटीनंतर मी जेव्हा जेव्हा पुण्याच्या पुढे सातारा , कराड , सांगली , कोल्हापूर , इचलकरंजी , ईस्लामपूर अगदी बेळगांव पर्यंत जरी नाटकाच्या प्रयोगासाठी गेलो तरी मी “प्रतीकच्या” रेंज मध्ये असतो … वर नमूद केलेल्या कोणत्याही गावांतल्या प्रत्येक प्रयोगाला हा पठ्ठ्या विंगेत उभा असतोच … त्याच्या बोलण्याला एक कर्नाटकी टच्च आहे … त्याचं “अरे दादा” हे नेहमी “अडे दादा…” ऐकू येतं … तसंच “काय करतोयेस” हे नेहमी “का कडालाईस …” असं ऐकू येतं…!!!
पश्चिम महाराष्ट्रात मी नाटकाच्या बसने प्रवास करत असलो तरी , त्याची गाडी मागे मागे धावत असते … मी थकलो तर “दादा तुला ज्यूस” येतोच … माझ्या प्रत्येक नाटकाच्या शुभारंभाला हा आवर्जून “निप्पाणीहून” येतो …
माझं टिव्हिवर काही असेल त्याचा पहिला प्रोमो हा पोस्टं करतो … आम्ही कायम कोल्हापूरच्या अंबाबाईचं आणि वाडीच्या दत्तगुरूंचं दर्शन एकत्रं घेतो … नरसोबाच्या वाडीला जाउन सोमणांच्या खानावळीत तुडूंब जेवणं हे आमचं पार्टी चं ठिकाण …
कोल्हापूर दौरा करुन जेंव्हा मी नाटकाच्या बसमध्ये बसून मध्यरात्री परत निघत असतो तेंव्हा डोळ्यात पाणी आणून
“दादा पडत लवकड ये काय…” असं म्हणून टाटा करतो …!!!
खरं सांगू ….? मी प्रतीकसाठी काहीही करत नाही, केलं नाही… पण तो कायम माझ्यासोबत असतो … हा काय ऋणानुबंध आहे सांगता येणार नाही … पण आहे खरा …
त्याची आई फार लवकर गेली… जाण्यापूर्वी मला फोन केला आणि कर्नाटक मिश्रित मराठीत मला म्हणाली …
“माझं बाळ तुम्हाला मोठं भाऊ मानतंय हो … त्याच्याकडं लक्षं ठिवा…”
मी कायम त्याच्यासोबत असेन , आहेच …
कधी निप्पाणी भागांत गेलात तर , शहा परिवाराच्या आमच्या प्रतीकला भेटा … तुमची पण भारी मैत्री होइल …
प्रतीक तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा …
‘टायगर इज बॅक…’, सलमान खानने ट्रोलर्सची बोलतीच बंद केली; भाईजानच्या बायसेप्सने वेधले लक्ष

Web Title: Actor sankarshan karhade share about his friend who met him at natak daura

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 05:13 PM

Topics:  

  • marathi actor
  • Marathi Television Show
  • sankarshan karahade
  • Television Shows

संबंधित बातम्या

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’
1

Onkar Bhojane: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ अचानक का सोडली? ओंकार भोजनेने केला मोठा खुलासा, म्हणाला- ‘माझ्यामुळे त्यांना…’

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा
2

Sumeet Raghavans Luxurious Home: अभिनयासोबत घराचीही भन्नाट पसंती! सुमीत राघवनच्या घरात संविधानासाठी खास जागा

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव
3

Prithvik Pratap: समोर आगीच्या ज्वाळा, रात्रीचा काळोख अन् मित्रांसोबत रोड ट्रिप; पृथ्वीक प्रतापने सांगितला थरारक अनुभव

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
4

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.