Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरद केळकरच्या ‘रानटी’चा खतरनाक ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांच्या भयानक लूकने वेधलं लक्ष…

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत 'रानटी' धडाकेबाज ॲक्शनपट घेऊन येतायेत. या ॲक्शनपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 11, 2024 | 05:07 PM
शरद केळकरच्या 'रानटी'चा खतरनाक ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांच्या भयानक लूकने वेधलं लक्ष...

शरद केळकरच्या 'रानटी'चा खतरनाक ट्रेलर रिलीज, संजय नार्वेकरांच्या भयानक लूकने वेधलं लक्ष...

Follow Us
Close
Follow Us:

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत रानटी धडाकेबाज ॲक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा ॲक्शनपट असणार आहे. ॲक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे.

हे देखील वाचा- “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कोणीही…”; विक्रांत मेस्सीचं वक्तव्य, टीकेचा भडीमार

माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते.पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी काही जणांना रानटी व्हावे लागते.

आजूबाजूची परिस्थिती त्यांना तसं बनवत असेल कदाचित त्यामुळेच काही रानटी असतात तर काही बनतात… असाच रानटीपणा घेऊन या दशकातील सर्वात मोठा ‘अँग्री यंग मॅन’ दिग्दर्शक समित कक्कड २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, ॲक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात.

 

आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, मराठीत ॲक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता. मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपूरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश करण्यासाठी विष्णु येतोय. याच विष्णूचा दमदार अवतार ट्रेलर मध्ये पहायला मिळतोय. पिळदार शरीरयष्टी, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरद यांचं ‘अँग्री यंग मॅन’ रूपच समोर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग विष्णूला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे.

हे देखील वाचा- अभिनेता अनिकेत विश्वासरावची Ex पत्नी स्नेहा चव्हाणने केले दुसरे लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!

अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी विष्णूचा ‘रानटी’ अवतार सज्ज झाला आहे. प्रसिध्द अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे.‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत लाभलं आहे. २२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

Web Title: Actor sharad kelkar upcoming marathi movie raanti trailer release sanjay narvekar and santosh juvekaer starcast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 05:07 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित
1

‘चिरंजीवी हनुमान’ चे पहिले पोस्टर रिलीज, जाणून घ्या AI जनरेटेड चित्रपट कधी होणार प्रदर्शित

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत
2

Kantara: ऋषभ शेट्टीच्या ‘कंतार चॅप्टर १’ मध्ये गुलशन देवैयाची एन्ट्री, अभिनेता दिसणार खास भूमिकेत

कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा
3

कोण आहे ब्रिटिश पत्रकार जेसिका? आमिरसोबत काय होते तिचे नाते? भाऊ फैसलने केला धक्कादायक खुलासा

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक
4

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.