(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
दिवाळी संपल्याबरोबरच लगेचच लग्न सोहळ्याचे समारंभ सुरु होतात. सर्वसामान्यांप्रमाणेच बरेच कलाकार मंडळी देखील विवाह बंधनात अडकताना दिसतात. गेल्या वर्षी अनेक मराठी कलाकारांनी लग्न करून त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये अनेक मराठी कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. याचदरम्यान अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने दुसरे लग्न केले आहे.
१० नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने मानस सोबत दुसरे लग्न केले. तिने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यामधून अभिनेत्रीने दुसऱ्यांदा लग्न केल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्नेहाने आपला इंस्टाग्राम स्टोरीवर मेहंदी समारंभाचे, लग्न सोहळ्याचे, जेवणाचे याचबरोबर नवऱ्यासह वेडिंग केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा लग्नाचा सोहळा अगदी घरगुती पद्धतीत पार पडला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीचे कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी उपस्थित राहिले होते.
हे देखील वाचा- सूरज चव्हाणने मागितली चाहत्यांची माफी, अंकिता आणि जान्हवीचं नाव घेत मागितली माफी; नेमकं काय घडलं ?
लग्नासाठी स्नेहाचे घर छान डिकोरेशन सजवलेले होते. दाराबाहेर सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. ज्यावर लग्नसोहळा असे लिहिलेले दिसले. काही फोटोंमध्ये स्नेहा आणि तिचा नवरा मानस या दोघांची एकमेकांना हार घालतानाची झलक पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या फोटोंमध्ये ती आणि तिचा नवरा वेस्टर्न कपडे परिधान करुन लग्नाचा केक कापताना दिसले आहेत.
हे देखील वाचा- बॉबी देओलचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांचा झाला थरकाप, सूर्याच्या ‘कांगुवा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज!
अभिनेत्री स्नेहा चव्हाणचे हे दुसरे लग्न आहे. याआधी अभिनेत्रीने मराठीतील लोकप्रिय अभिनेता अनिकेत विश्वासराव सोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या दीड दोन वर्षातच त्यांच्यात वाद सुरू झाले आणि मग त्यांनी घटस्फोट घेतला.आणि दोघेही विभक्त झाले. स्नेहाने अनिकेत आणि त्याच्या आईवडिलांवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. अनिकेत आणि त्याची आई तिच्यावर हात उचलायचे असे तिने आरोप केले होते. स्नेहा चव्हाण ही लाल इश्क या चित्रपटासाठी सर्वत्र ओळखली जाते. कामाच्या आघाडीवर अभिनेत्री स्नेहा चव्हाणने स्वप्निल जोशी सोबत लाल इश्क तसेच हृदयात वाजे समथिंग, ७०२ दिक्षित, नागपूर अधिवेशन, कुसुम मनोहर लेले, सिनियर सिटिझन यांसारख्या सिनेमात काम केले आहे. जे चाहत्यांना अजूनही पाहायला आवडत आहेत.