अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नवा रेकॉर्ड, पंतप्रधान मोदींनाही टाकलं मागे
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या ‘स्त्री २’ मुळे चांगलीच प्रसिद्धीझोतात आहे. ह्या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अवघ्या सहा दिवसांतच ३०० कोटींहून अधिकची कमाई केलेली आहे. चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडित काढत स्वत:च्या नावावर नवा विक्रम रचला आहे. अशातच आता ‘स्त्री २’ फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही स्वत:च्या नावावर एक अनोखा विक्रम केला आहे. खुद्द अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकत स्वत:च्या नावावर नवा विक्रम केला आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचे इन्स्टाग्रामवर ९१.५ दशलक्ष फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. अभिनेत्रीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मागे टाकलं आहे. पंतप्रधान मोदींचे इन्स्टाग्रामवर ९१.३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा काही फॉलोअर्स तिचे जास्त आहेत. तर एक्सवर अर्थात ट्वीटरवर पंतप्रधान मोदी यांचे १०१.२ दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पीएम मोदी X (ट्वीटर) वर सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते आहेत. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत पंतप्रधानांचा समावेश होतो.
सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या युजर्समध्ये पहिल्या क्रमांकावर क्रिकेटर विराट कोहली आहे. विराटचे फॉलोअर्स २७० दशलक्ष फॉलोअर्स आहे. दुसऱ्या क्रमांकावर प्रियंका चोप्रा आहे. तिचे ९१.८ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रद्धा कपूर आहे. तर चौथ्या क्रमांकावर पंतप्रधान मोदी आहेत. आलिया भट्टचे सोशल मीडियावर ८५.२ दशलक्ष फॉलोअर्स असून ती पाचव्या क्रमांकावर आहे. तर सहाव्या क्रमांकावर कतरिना कैफ असून तिचे ८०.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर सातव्या क्रमांकावर दीपिका पादुकोण असून तिचा चाहतावर्ग ७९.८ दशलक्ष इतका आहे.
दरम्यान, श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या ‘स्त्री २’ चित्रपटाने ६ दिवसांत जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर ३१७ कोटींची कमाई केली आहे. २०१८ मध्ये आलेल्या ‘स्त्री’चा हा सिक्वेल आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे.