Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हा राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान…”, प्रोटोकॉल उल्लंघनावरून पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान झालेल्या प्रोटोकॉल उल्लंघनावरून मोदींनी ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले. "हा केवळ एका राष्ट्रपतीचा अपमान नसून देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही परंपरेचा अवमान आहे."

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 03:42 PM
प्रोटोकॉल उल्लंघनावरून पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात (Photo Credit- X)

प्रोटोकॉल उल्लंघनावरून पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “हा राष्ट्रपतींचा नव्हे, तर संविधानाचा अपमान…”,
  • प्रोटोकॉल उल्लंघनावरून पंतप्रधान मोदींचा ममता सरकारवर घणाघात
  • वाचा काय म्हणाले….
PM Narendra Modi on TMC: आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी दिल्लीत सुमारे ३३,५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या सोहळ्यात जनसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या बंगाल दौऱ्यादरम्यान झालेल्या प्रोटोकॉल उल्लंघनावरून मोदींनी ममता बॅनर्जी सरकारला धारेवर धरले. “हा केवळ एका राष्ट्रपतीचा अपमान नसून देशाच्या संविधानाचा आणि लोकशाही परंपरेचा अवमान आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

आदिवासी अस्मितेचा आणि राष्ट्रपतींचा अवमान

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज संपूर्ण देश महिला शक्तीचा सन्मान करत असताना, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी सरकारने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा घोर अपमान केला आहे. राष्ट्रपती मुर्मू या संथाल समुदायाच्या एका मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी बंगालला गेल्या होत्या. मात्र, त्यांच्या स्वागताऐवजी टीएमसीने या महत्त्वपूर्ण आयोजनावर बहिष्कार टाकून आपली संकुचित वृत्ती दाखवून दिली आहे.”

🚨 PM Modi slams TMC for boycotting President Droupadi Murmu’s Bengal event:
“Insult to tribal daughter, Constitution & democracy!”
TMC’s ego-driven mismanagement shames women, tribals & nation. Bengal won’t forgive—power arrogance ends soon! 🔥 pic.twitter.com/0Lcm9Pqmwi
— The Alternate Media (@AlternateMediaX) March 8, 2026

राष्ट्रपती मुर्मू या स्वतः आदिवासी समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या कार्यक्रमाकडे राज्य सरकारने केलेले दुर्लक्ष हे संविधानाच्या भावनेच्या विरोधात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. “टीएमसीने हा कार्यक्रम केवळ कुप्रबंधनाच्या भरवशावर सोडला. हे वर्तन लोकशाहीच्या महान परंपरेला काळिमा फासणारे आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

BJP राजकारणासाठी राष्ट्रपतींचा वापर, वर्षातून कितीवेळा येणार..? CM ममता बॅनर्जींचा अपमान प्रकरणावरुन चढला पारा

‘अहंकाराचा नाश निश्चित’; पंतप्रधानांचा इशारा

ममता सरकारवर निशाणा साधताना मोदींनी सत्तेच्या अहंकारावरून इशारा दिला. “शक्ती कितीही मोठी असली तरी अहंकार शेवटी विनाशाला कारणीभूत ठरतो. एका आदिवासी महिला राष्ट्रपतींच्या गरिमेचा अपमान करणाऱ्या टीएमसीच्या गलिच्छ राजकारणाचा आणि सत्तेच्या अहंकाराचा फुगा लवकरच फुटेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बंगालची जनता, आदिवासी समाज आणि देशातील महिला या अपमानासाठी टीएमसीला कधीही माफ करणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

नेमका वाद काय?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दार्जिलिंग जिल्ह्यातील ९ व्या आंतरराष्ट्रीय संथाल संमेलनासाठी मुख्य अतिथी म्हणून गेल्या होत्या. मूळ कार्यक्रम फाशीदेवा ब्लॉक येथील बिधाननगरमध्ये प्रस्तावित होता, जिथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव येणार होते. मात्र, राज्य प्रशासनाने सुरक्षेचे कारण देत हा कार्यक्रम बागडोगरा विमानतळाजवळील गोशाईपूर येथे हलवला.

प्रोटोकॉल पाळणे हे….

कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर राष्ट्रपतींनी स्वतः या बदलावर नाराजी व्यक्त केली. जागा लहान असल्यामुळे अनेक आदिवासी बांधवांना तिथे पोहोचता आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी ना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आल्या, ना त्यांचा कोणताही मंत्री उपस्थित होता. राष्ट्रपतींनी ममता बॅनर्जी यांचा ‘लहान बहीण’ असा उल्लेख करत, “प्रोटोकॉल पाळणे हे पदाच्या गरिमेसाठी आवश्यक आहे, तुम्ही माझ्यावर नाराज आहात का?” असा प्रश्न विचारल्याने या वादाला तोंड फुटले.

ममता बॅनर्जींचे स्पष्टीकरण

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने लावलेले सर्व आरोप ममता बॅनर्जी यांनी फेटाळून लावले आहेत. या कार्यक्रमाबाबत राज्य सरकारला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, असा दावा टीएमसीकडून करण्यात आला आहे. मात्र, केंद्र आणि राज्यांमधील हा प्रोटोकॉल वाद आता राष्ट्रीय स्तरावर तापला असून, आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

CM ममता बॅंनर्जींना राष्ट्रपतींचा अपमान भोवणार? पश्चिम बंगालमध्ये घटनेची गृह विभागाकडून दखल

Web Title: Pm modi slams mamata government for violating protocol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • international women's day
  • Mamata Banerjee
  • PM Narendra Modi
  • TMC

संबंधित बातम्या

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड
1

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला; जुन्नर तालुक्यातील शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक भुर्दंड

Delimitation Plan: २०२९ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? मोदी सरकारचा ‘हा’ मास्टरप्लॅन तयार; देशाचा राजकीय नकाशा बदलणार!
2

Delimitation Plan: २०२९ च्या निवडणुकीत गेमचेंजर ठरणार? मोदी सरकारचा ‘हा’ मास्टरप्लॅन तयार; देशाचा राजकीय नकाशा बदलणार!

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का
3

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; ममता बॅनर्जींना धक्का

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य
4

‘ममता बॅनर्जींचे सरकारच गेले नाही, तर आता…’, ममता बॅनर्जींच्या पक्षातील फुटीवर शिंदे गटाचे नेत्याचे मोठे वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.