(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
टेलिव्हिजनवरील अनेक प्रसिद्ध शोची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असते. त्यातीलच एक शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. गेल्या अनेक दिवसांपासून हा शो टिव्हीवर बंद झाला असून लवकरच आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ ओटीटीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या सीझनला दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘नेटफ्लिक्स’च्या इन्स्टाग्राम हँडलवर एक धडाकेबाज प्रोमो शेअर करत शोची घोषणा केली आहे.
हे देखील वाचा – शाहरूख खानने मागितलेली प्रसिद्ध दिग्दर्शकांची माफी, नेमकं कारण काय?
गेल्या काही दिवसांपूर्वीच शोच्या पहिल्या सीझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. फार कमी कालावधीतच शोने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यामुळे चाहते नाराज झाले होते. आता पुन्हा एकदा कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत होते. काही तासांपूर्वीच ‘नेटफ्लिक्स’ने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक प्रोमो शेअर केला आहे. प्रोमो शेअर करताना कॅप्शन दिले की, “आता शनिवार होणार ‘फनिवार’ कपिल शर्मा आणि त्याची टीम खास यावेळी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, मनोरंजनाचा डबल धमाका… लवकरच कपिल शर्माचा दुसरा सीझन टेलिकास्ट होईल” असं कॅप्शन देत प्रोमो शेअर केलेला आहे.
अर्चना पूरण सिंह, कपिल शर्मा, सुनिल ग्रोव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, राजीव ठाकूर अशी सर्व स्टारकास्ट तुम्हाला शेअर केलेल्या प्रोमोमध्ये दिसेल. लवकरच तुमच्या भेटीला डबल मनोरंजनाचा धमाका घेऊन येत आहोत. असं हे कलाकार म्हणताना दिसत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या सीझनची थीम इंस्ट्रूमेंटल थीम असणार आहे. या थीमला अमन पंत यांनी संगीत दिले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दुसऱ्या सीझनच्या शुटिंगला १३ ऑगस्टपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या सीझनला एयरपोर्टच्या थीम होती. ती थीमही अमन पंत यांनीच तयार केली होती. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’चा पहिला सीझन १३ एपिसोडनंतर संपला होता.
‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या पहिल्या सीझनमध्ये बॉलिवूड, संगीत आणि क्रिकेटमधील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता सीझन २ मध्ये कोणते सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार हे पाहणे मनोरंजक असेल. ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’ हा शो १९२ देशांमध्ये टेलिकास्ट होणार आहे.