(फोटो सौजन्य: istock)
परदेश फिरण्याचे स्वप्न जवळजवळ प्रत्येकाच्याच मनात कधीतरी डोकावते. नवीन संस्कृती, वेगवेगळे खाद्यपदार्थ, मन मोहून टाकणारे निसर्गचित्र आणि काही काळ जरी का होईना, रोजच्या धकाधकीपासून सुटका, हे सगळं अनुभवण्यासाठी परदेश प्रवासाची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, परदेश म्हणजे प्रचंड खर्च, लाखोंची गरज आणि आर्थिक भार अशी अनेकांच्या मनात भीती बसलेली असते. पण आजच्या काळात ही भीती वास्तविक नाही. योग्य नियोजन केल्यास आणि योग्य ठिकाणांची निवड केल्यास परदेश प्रवास कमी बजेटमध्येही शक्य आहे. आशियातील काही देश तर भारतीयांना अतिशय कमी खर्चात सुंदर अनुभव देतात.
ताजमहालच्याही आधी बनला आहे ‘बेबी ताज’; खूप रंजक आहे याची कहाणी
नेपाळ: सुंदर आणि परवडणारे ठिकाण
भारतीयांसाठी सर्वात जवळचे आणि बजेट-फ्रेंडली देश म्हणजे नेपाळ. हिमालयाची भव्यता, मंदिरे, साहसी ट्रेक्स आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण अनेकांना आकर्षित करते. चार ते पाच दिवसांच्या सहलीसाठी साधारण ₹35,000 ते ₹40,000 इतका खर्च येतो. यात फ्लाइट, हॉटेल, स्थानिक प्रवास आणि जेवण सर्व समाविष्ट होतं. ऑक्टोबर ते मार्च हा काळ पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो. भारतातून भूप्रदेश मार्गानेही येथे जाता येत असल्याने खर्च आणखी कमी होऊ शकतो.
कझाकिस्तान : कमी खर्चात विदेशी अनुभव
परदेश प्रवासात वेगळेपण हवे आणि बजेटही कमी असावे, तर कझाकिस्तान नक्कीच उत्तम पर्याय आहे. या देशात भारतीय पर्यटकांना वीजा प्रक्रियेतही फार अडथळे येत नाहीत. जून ते सप्टेंबर हा काळ इथे फिरण्यासाठी उत्तम समजला जातो. दिल्लीतून फ्लाइट साधारण ₹12,000 मध्ये मिळू शकते. म्हणजेच दोन्ही बाजूंचा समग्र खर्च ₹24,000 च्या आसपास बसतो. हॉटेल, जेवण आणि स्थानिक प्रवास धरून एकूण बजेट ₹40,000 मध्ये सहज जमून येतं. विस्तीर्ण स्टेपीज, मॉडर्न शहरे आणि अप्रतिम निसर्गसौंदर्य यामुळे हा देश एक अविस्मरणीय अनुभव देतो.
कमी बजेटमध्ये परदेश प्रवासासाठी उपयुक्त टिप्स
योग्य नियोजन, स्मार्ट बुकिंग आणि योग्य डेस्टिनेशन निवड या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर परदेश प्रवासासाठी लाखोंचा खर्च करावा लागत नाही. कमी बजेटमध्येही सुंदर आठवणी आणि आंतरराष्ट्रीय अनुभव घेता येऊ शकतो!






