Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ती परत आलीये! ३० वर्षांनंतर ‘दामिनी 2.0’ पुन्हा सह्याद्रीवर झळकणार

'दामिनी' ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला होता आता या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 11, 2025 | 03:40 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

`सत्यता शोधण्या, घेऊनी लेखणी, जाहली दामिनी, मूर्त सौदामिनी हे गाणं घराघरांत वाजलं कि, घरातला प्रत्येक जण दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासमोर हजर व्हायचा आणि ‘दामिनी’ या मालिकेमध्ये गुंतून जायचा. दूरदर्शन सह्याद्रीवरची पहिली दैनंदिन मालिका ‘दामिनी’.. पाच वर्षांचा कालावधी, १५०० एपिसोड्स, अनेक गुणी कलाकार, तंत्रज्ञांचा सहभाग आणि… प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम.

‘दामिनी’ ही मालिका दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर सुरू झाली, तेव्हा तिने एक इतिहास घडवला. प्रतीक्षा लोणकर, क्षिती जोग या अभिनेत्रींनी आधी या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या. सुबोध भावे आणि क्षिती जोग यांची या मालिकेतील जोडीही गाजली. आता तीस वर्षांनी, या मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात, नव्या दिमाखात पुन्हा त्याच वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दामिनी 2 मध्ये किरण पावसे ही साताऱ्याची अभिनेत्री मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्यासह पुण्याचा ध्रुव दातार हा अभिनेता नायकाच्या भूमिकेत आहे.

अभय देओलच्या खासगी आयुष्याची चर्चा; विदेशी तरुणीसोबत फोटो व्हायरल, सनी देओलची खास कमेंट!

तीस वर्षांनी मालिकेचा दुसरा सीझन नव्या रूपात

येत्या १३ ऑक्टोबरपासून, ‘दामिनी२.०’.ही मालिका सह्याद्री वाहिनीवर सुरू होणार आहे. ही दामिनी आता नव्या रूपात, नव्या उत्साहात दाखल होणार असली, तरी तिची प्रेरणा, ऊर्जा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द तीच आहे. आपल्या आजीचा वारसा घेऊनच ही दामिनीही पत्रकारितेच्या नव्या क्षेत्रात लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सज्ज झाली आहे. ध्रुव दातार हा अभिनेता या मालिकेतून नायकाच्या भूमिकेत झळकत आहे. नव्या दमाच्या कलाकारांबरोबरच आधीच्या दामिनी मालिकेतील सुबोध भावे आणि क्षिती जोग, हे कलाकारही या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आधीच्या मालिकेवर प्रेक्षकांनी जसं प्रेम केलं, तसंच या मालिकेवरही करतील, असा विश्वास सगळ्यांना आहे.

जागतिक कन्या दिनानिमित्त ‘आशा’ चित्रपटाची भव्य स्क्रीनिंग; डॉ. श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती!

मूळ संकल्पना स्व. गौतम अधिकारी, मार्कंड अधिकारी यांची आहे. कांचन अधिकारी यांनी कथा, पटकथा लेखन आणि मालिका दिग्दर्शन केले आहे. विठ्ठल डाकवे हे एपिसोड दिग्दर्शक आहेत. कथाविस्तार आणि संवादलेखन अभिजित पेंढारकर यांचे आहे. मुंबई दूरदर्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.

Web Title: After 30 years damini is coming back to meet the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची तारीख बदलली! १२ जानेवारीऐवजी आता ‘या’ दिवशी होणार पहिला एपिसोड प्रसारित
1

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची तारीख बदलली! १२ जानेवारीऐवजी आता ‘या’ दिवशी होणार पहिला एपिसोड प्रसारित

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…
2

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात
3

अखेर शशांक केतकरने स्क्रिन शॉट्ससह केलं नाव जाहीर, 5 लाख बुडवणारा ‘हा’ मराठी निर्माता गोत्यात

सुपारी फुटली! अभिनेत्री गायत्री दातार लवकरच अडकणार लग्नबंधनात, खास व्हिडिओ केला शेअर
4

सुपारी फुटली! अभिनेत्री गायत्री दातार लवकरच अडकणार लग्नबंधनात, खास व्हिडिओ केला शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.