‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण या चित्रपटाच्या समर्थनार्थ मत मांडताना दिसत आहेत. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. रविवारी हा चित्रपट पाहिल्यानंतर एका तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. अभिजित शशिकांत शिंदे (३८) असे मृताचे नाव आहे(After watching the movie ‘The Kashmir Files’, the young man’s brain vein ruptured; Shocking incident in Pune).
चिंचवडमध्ये रविवारी ही घटना घडली. अहवालानुसार, मृत तरुणावर हिंदुत्ववादी संघटनांचा प्रभाव होता. 21 मार्च रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो मित्रांसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. चित्रपट पाहिल्यानंतर जवळपास तासभर त्याने मित्रांशी चर्चा केली. त्यानंतर तो कोणाशीही न बोलता थेट झोपी गेला. सकाळी अभिजीतचे वडील खोलीत गेले असता तो बेशुद्धावस्थेत असल्याचे त्यांना दिसले.
यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी तात्काळ अभिजीतला खासगी रुग्णालयात नेले. अभिजीतला सकाळी ब्रेन स्ट्रोक झाला आणि मेंदूला रक्त वाहून नेणारी रक्तवाहिनी फुटल्याने त्याचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगीतले. अभिजीतला उच्च रक्तदाब असल्याने तो खूप संवेदनशील होता.
11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केले आहे. हा चित्रपट 1990 च्या दशकात काश्मीरमधील नरसंहार आणि काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी, पल्लवी जोशी, दर्शन कुमार यांसारखे कलाकार दिसले आहेत. या चित्रपटाने जगभरात 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]