‘पिंपरी चिंचवड क्रिकेट करंडक
याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आणि स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरातील क्रिकेट खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने संघटनेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून १६ संघांचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला आहे. बाद फेरीनुसार होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास
२नाईन स्पोर्ट्स, एचएस पँथर्स, सह्यांद्री किंग्ज्, व्हीडीआर क्रिकेट ॲकॅडमी, यशवी क्रिकेट ॲकॅडमी, अव्दिका स्पोर्ट्स, शिवाजीयन्स् क्रिकेट क्लब, विन टेंपल क्लब, बजरंग दल, पीसीएमसी फायर डिपार्टमेंट, क्रिक पँथर, एसजेएसएफ यंगस्टर्स, लक्ष्य क्रिकेट ॲकॅडमी, प्राधीकरण जिमखाना, मावळ वॉरीयर्स आणि यजमान पिंपरी चिंचवड क्रिकेट ॲकॅडमी असे १६ संघ स्पर्धेत झुंझणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २५ हजार रोख रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला १५ हजार रूपये आणि करंडक तसेच तृतीय क्रमांकाच्या संघाला पाच हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. यामध्ये स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलु खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अशी पारितोषिके मिळणार आहेत.
Cricket News: ओम शहाच्या भेदक माऱ्यापुढे ‘डीपीईएस’ टीम घायाळ; DSP करंडकमध्ये महाथरार…
याशिवाय स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी पारितोषिकांची रेलचेल असणार आहे. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आगामी तिसऱ्या ‘पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग’ टी-२० या भव्य स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना २नाईन स्पोर्ट्स आणि एचएस पँथर्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे.






