Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिमुकल्या फॅनसाठी सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा बनला ‘पुष्षा’, ‘झुकेगा नही साला’ म्हणत केलं असं काही… पाहा व्हिडीओ

पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याने 'मेक-अ-विश फाउंडेशन'च्या माध्यमातून एका लहान चिमुकल्या चाहतीची इच्छा पूर्ण केल्याच्या या हृदयस्पर्शी आणि सकारात्मक क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 20, 2026 | 04:13 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अल्लू अर्जुन हा देशातील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया स्टार्सपैकी एक असून, सर्व वयोगटांमध्ये त्याचा प्रचंड चाहतावर्ग आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे आणि विक्रमी बॉक्स ऑफिस यशामुळे तो सिनेसृष्टीतील आयकॉन बनला असला, तरी पडद्यामागील त्याचा साधेपणा आणि आपुलकी यामुळे तो लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकतेच त्याच्या टीमने एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये त्याने ‘मेक-अ-विश फाउंडेशन’च्या माध्यमातून एका चिमुकल्या चाहतीची इच्छा पूर्ण केली.

Cocktail 2 Box Office Collection : शाहिदने इतर सिनेमांची केली हवा टाईट! पहिल्याच दिवशी केली मोठी कमाई 

मुलीशी मनमोकळ्या गप्पा

या खास भेटीदरम्यान अल्लू अर्जुनने त्या मुलीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि ‘पुष्पा’ चित्रपटातील त्याचा प्रसिद्ध डायलॉग “झुकेगा नही साला” तिच्यासोबत पुन्हा साकारला. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. तसेच ती बरी झाल्यानंतर हैदराबादला भेट देण्याचे आमंत्रणही त्याने दिले, ज्यामुळे हा क्षण आणखी खास ठरला.

जीवघेण्या आजारांशी झुंज

‘मेक-अ-विश फाउंडेशन’चा सेलिब्रिटी अॅडव्होकेट म्हणून अल्लू अर्जुन सातत्याने जीवघेण्या आजारांशी झुंज देणाऱ्या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे तो केवळ सुपरस्टार नसून समाजासाठी संवेदनशील आणि काळजी घेणारा व्यक्ती असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

चित्रपटांच्या पलीकडे आनंदाची उधळण

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “चित्रपटांच्या पलीकडे आनंदाची उधळण आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने ‘मेक-अ-विश फाउंडेशन’च्या माध्यमातून श्रद्धाशी संवाद साधत तिच्यासाठी आनंददायी आणि अविस्मरणीय क्षण निर्माण केला. त्याच्या मनमिळाऊ स्वभावाचे आणि करुणेचे हे सुंदर उदाहरण आहे. ”

कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, सलग ब्लॉकबस्टर यशानंतर अल्लू अर्जुन भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. आगामी काळात तो दिग्दर्शक अॅटली यांच्या ‘राका’ या चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत झळकणार आहे. याशिवाय ‘AA23’, ‘पुष्पा 3: द रॅम्पेज’ आणि इतर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Cocktail 2 : सिनेमाला अडल्ट सर्टिफिकेट, शाहिद कपूर भडकला! Censor Board च्या निर्णयाने अभिनेता नाराज

Web Title: Allu arjun meets child fan make a wish foundation pushpa dialogue see video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Entertainment News
  • Hindi Movie
  • Marathi News
  • Social Media

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.