Ankita Walawalkar Kunal Bhagar Sangeet Photos
गेल्या अनेक दिवसांपासून अंकिता- कुणालच्या लग्नाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. तेव्हापासून चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीच्या लग्नाची कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. आता अभिनेत्रीच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झालीये.
नुकताच अंकिता- कुणालचा साखरपुडा आणि संगीतचा कार्यक्रम आटोपला असून आता त्यांचा मेहेंदीचाही कार्यक्रम आटोपला आहे. या सर्व कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून या सेलिब्रिटी कपलवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
अंकिता- कुणालच्या संगीत नाईटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. शनिवारी रात्री कोकणातील देवबागच्या समुद्रकिनारी अंकिता आणि कुणालचा संगीतसोहळा पार पडला. त्यांच्या संगीत सोहळ्याचं जंगी आयोजन करण्यात आलं होतं.
अंकिता आणि कुणालने संगीत सोहळ्यासाठी वेस्टर्न आऊटफिटला पसंती दिली होती. अंकिताने लाल रंगाचा वन पीस घालत ग्लॅमरस लूक केला होता. तर कुणालने ब्लेझर घातला होता. त्यांच्या संगीत सोहळ्यातील धमालमस्ती करतानाचे अनेक फोटो- व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
शनिवारी अंकिताचा वाढदिवसही होता. अंकिताच्या वाढदिवसाचंही सेलिब्रेशन करण्यात आलं. दरम्यान, अंकिता आणि कुणाल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांच्या लग्न सोहळ्याला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हजेरी लावणार आहेत.