जिओ स्टुडिओ (Jio Studios) आणि आनंद एल राय (Anand L Rai) यांचं कलर यलो प्रॉडक्शन्स हे नेहमीच त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्ससाठी ओळखले जातात. लवकरच ते ‘नखरेवाली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अंश दुग्गलचं अभिनय क्षेत्रात पदार्पण
सिनेसृष्टीतील उदयोन्मुख नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलर यलो प्रॉडक्शनने अंश दुग्गलची या प्रोजेक्टसाठी मुख्य भूमिकेसाठी निवड केली आहे. हा चित्रपट राहुल शांकल्या दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा करणार आहेत.
चित्रपटाच्या थीमची एक झलक नुकत्याच रिलीज झालेल्या व्हिडिओमधून प्रेक्षकांना दिसणार आहे. अभिनेता अंश दुग्गल याने या प्रकल्पाविषयी उत्साह व्यक्त करताना सांगितले की, “आनंद सर आणि आमचे दिग्दर्शक राहुल शंकल्य यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. हे खरोखर एक स्वप्न पूर्ण झाले आहे आणि मी खूप आनंदी आहे. या अविश्वसनीय प्रवासाची खूप आतुरतेने वाट पाहत आहे. आज माझ्या आयुष्यातील एका रोमांचक अध्यायाची सुरुवात आहे .”