(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘ओल्ड टाउन रोड’ या अल्बमसाठी जगभरात प्रसिद्ध असलेले ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित रॅपर लिल नास एक्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी रॅपर लॉस एंजेलिसमधील व्हेंचुरा बुलेव्हार्डच्या रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत फिरताना आढळला, ज्यामुळे तेथील स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे. चला जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण काय आहे. तसेच रॅपरचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Bigg Boss 19: अखेर ‘हे’ १८ स्पर्धक दिसणार ‘बिग बॉस’च्या घरात; जाणून घ्या संपूर्ण यादी
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुरुवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी फक्त अंडरवेअर आणि काउबॉय बूट घातलेला एक माणूस पाहिला, त्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. लॉस एंजेलिस पोलिसांचे प्रवक्ते चार्ल्स मिलर म्हणाले की, सकाळी ६ वाजताच्या सुमारास स्टुडिओ सिटी परिसरातील व्हेंचुरा बुलेव्हार्डवर अधिकाऱ्यांना हा व्यक्ती फिरताना आढळला. त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा पोलिस तिथे पोहोचले तेव्हा त्या माणसाने त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले. टीएमझेडच्या व्हिडिओ फुटेजनुसार, त्या माणसाचे नाव लिल नास एक्स असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी रॅपरला प्रथम रुग्णालयात नेले
चार्ल्स मिलर म्हणाले की, तेथे पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी ड्रग्ज ओव्हरडोजच्या संशयावरून रस्त्यावरून चालणाऱ्या त्या माणसाला प्रथम रुग्णालयात नेण्यात आले असे सांगितले. त्याच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही, परंतु काही तासांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन तुरुंगात नेण्यात आले. तसेच, लिल नास एक्सच्या प्रतिनिधींनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच आता रॅपरचे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री तेजस्वीनी लोणारीचा अनोखा उपक्रम ‘टेम्पल ट्रेल्स’! मनोरंजनाचे नवे माध्यम
लिल नास एक्स कोण आहे?
अटलांटाचा २६ वर्षीय रॅपर आणि गायक लिल नास एक्स हा २०१८ च्या त्याच्या सर्वात प्रसिद्ध अल्बम “ओल्ड टाउन रोड” साठी ओळखला जातो. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडले. याशिवाय, २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘मोंटेरो’ अल्बमसाठी रॅपरला ग्रॅमी पुरस्कारासाठी देखील नामांकन मिळाले होते. आता रॅपरच्या या प्रकरणामुळे तो चांगलाच संकटात अडकला आहे.