Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने सलग ३० दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हा चित्रपट आजही सगळीकडे यशस्वीपणे झळकत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 24, 2025 | 04:57 PM
‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

Follow Us
Follow Us:

मापुस्कर ब्रदर्सच्या ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाने सलग ३० दिवस पूर्ण करत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे हा चित्रपट आजही सगळीकडे यशस्वीपणे झळकत आहे. चित्रपटातील कलाकार श्रेयस थोरात, मंथन काणेकर, आर्यन मेंगजी व साजिरी जोशी यांच्या दमदार अभिनयासह, ९० च्या दशकातली निरागस मैत्री, उन्हाळ्याची मजा आणि शाळकरी आठवणी ‘एप्रिल मे ९९’ मध्ये सुरेख पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. रोहन-रोहन यांचे संगीत, जबरदस्त गाणी आणि साध्या तरीही प्रभावी कथानकामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर केवळ प्रेक्षकांनीच नाही तर चित्रपटसृष्टीतील कलाकार व समीक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले.

‘तेरे नाम’ मधली गाजलेली हेअरस्टाईल कोणापासून प्रेरित होती? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “हे माझे पहिलेच दिग्दर्शन असून प्रेक्षकांनी हा चित्रपट मनापासून स्वीकारला, याचा खूप आनंद आहे. प्रत्येकाला उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टालजिक सफर घडवणारा हा चित्रपट प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस उतरत आहे, हे पाहून मन भरून येते. हे यश माझे एकट्याचे नसून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे, कलाकारांचे व प्रेक्षकांचे आहे.”

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ ‘एप्रिल मे ९९’ ही आपल्या सर्वांची गोष्ट आहे. कोकणातल्या उन्हाळ्याची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. तीच आठवण जिवंत करण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला व प्रेक्षकांनी तो मनापासून स्वीकारला, यासाठी प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो.”

अखेर पुन्हा परतला ‘श्रीकांत तिवारी’, मनोज बाजपेयीच्या ‘The Family Man 3’ पोस्टरने वेधले लक्ष

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

Web Title: April may 99 marathi movie completed 30 days in theaters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bandhu Marathi Movie: प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
1

Bandhu Marathi Movie: प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष
2

Shital Upare Engagement: अभिनेत्री शितल उपरेने उरकला साखरपुडा! अमित सिंह यांच्यासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील
3

Maharashtra Epstein Files: ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडणार! मनोज जोशींचा दमदार लूक रिव्हील

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
4

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.