Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालपणाच्या मैत्रीची आठवण करून देणारे ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित, पुन्हा एकदा उन्हाळ्यातल्या दिवसांना मिळणार उजाळा

उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 04, 2025 | 03:42 PM
‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

‘एप्रिल मे ९९’ सलग ३० दिवस चित्रपटगृहांत, चित्रपटाने गाठला यशाचा टप्पा!

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच नुकतेच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरने घेतली आलिशान कार! Video शेअर करत दाखवली नव्या कारची झलक

‘मन जाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची जाईशी होणारी घट्ट मैत्री यात दाखवण्यात आली आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ हा एक चित्रपट नाही तर ९० च्या दशकातील प्रत्येकाच्या बालपणाची नाजूक आठवण आहे. आम्ही प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील गोड क्षण पुन्हा अनुभवता यावेत. प्रदर्शित झालेले गाणे हे त्या बालमैत्रीचे आणि नकळत्या वयातील भावनांचे प्रतिबिंब आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आपल्या बालमित्रांची आठवणी नक्की येईल.”

विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक; वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात,” या गाण्यातून आम्ही त्या निष्पाप भावनांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या वयात मैत्री आणि प्रेम यामधील रेषा फारच धूसर असतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई यांची मैत्री आणि त्यातून नकळत फुलणारी भावना ही प्रत्येकाने अनुभवलेली असते. या गाण्यातून प्रेक्षकवर्ग त्यांचे स्वतःचे बालपण नक्कीच अनुभवतील. ९० व्या दशकाची ही गोड सफर प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

Web Title: April may 99 marathi movie mann jaie song released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie

संबंधित बातम्या

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह
1

नऊ दिवस, नऊ कथा, ‘अल्ट्रा झकास’वर नवरात्री विशेष चित्रपटांचा संग्रह

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात
2

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीमकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
3

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
4

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.