Bigg Boss Marathi 5 Fame Actress Jahnavi Killekar buys New Car
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधून महाराष्ट्रातल्या घराघरांत अभिनेत्री जान्हवी किल्लेकर प्रसिद्धीझोतात आली. तिने त्यापूर्वी अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. जरीही जान्हवीने लोकप्रिय मालिकेत काम केले असले तरीही तिला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी ‘बिग बॉस’मुळेच मिळाली. जान्हवीने बिग बॉसच्या घरात महाअंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण तिचं बिग बॉसच्या ट्रॉफीचं स्वप्न भंगलं. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी, जान्हवी किल्लेकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
१९ वर्षीय प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्रीने केली आत्महत्या, बंद खोलीत आढळली वाईट अवस्थेत !
जान्हवी किल्लेकरच्या वैयक्तिक आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे. जान्हवीने आता नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या जान्हवीने नुकतेच इन्स्टाग्रामवर नवी कार खरेदी केल्याचा व्हिडिओ शेअर केला. दरम्यान, जान्हवीने आता महिंद्रा कंपनीची XUV700 ही नवी कोरी अलिशान कार खरेदी केलेली आहे. काळ्या रंगाची जान्हवी नवी कार असून तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी शेअर केलीये. जान्हवीने नव्या कारची झलक इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलंय की, “My New Big Toy… My Butterfly” अभिनेत्रीने व्हिडिओला असं कॅप्शन दिलंय.
‘सब बिका हुआ है…’ गायक मिका सिंगने बॉलिवूड पुरस्कार सोहळ्याचा केला पर्दाफाश!
जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडिओविषयी बोलायचे तर, व्हिडिओच्या सुरुवातीला अभिनेत्री तिच्या नव्या कारच्या डॉक्यूमेंट्सवर सह्या करताना दिसतेय. त्यानंतर ती आपल्या फॅमिलीसोबत कारवरील पडदा काढताना दिसत आहे. पती, मुलगा आणि इतर कुटुंबीयांसोबत जान्हवीने नव्या कारची पूजा केली. गाडीची पूजा केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या हातांचे ठसे गाडीच्या बोनेटवर उमटवल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. जान्हवीच्या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. कार खरेदी केल्यानंतर अभिनेत्रीच्या चेहेऱ्यावरील आनंद अगदी स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
कार खरेदी केल्यानंतर जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिजीत सावंत, पुष्कर जोग या कलाकारांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. जान्हवी किल्लेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘आई माझी काळुबाई’, ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकांमध्ये ती दिसली होती. तर काही अल्बम साँगमध्येही तिने काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये जान्हवी सहभागी झाली होती. त्याबरोबरच या सीझनच्या टॉप ५ फायनलिस्टपैकी ती एक होती. काही दिवसांपूर्वीच जान्हवीने ‘स्टार प्रवाह’वरील ‘अबोली’ मालिकेत एन्ट्री घेतली होती. याशिवाय नुकतीच ती सूरज चव्हाणच्या “वाजीव दादा” गाण्यात पाहुणी कलाकार म्हणून झळकली आहे.