विवाहित पुरुषासोबत अफेअर, साखरपुडा मोडला अन् प्रायव्हेट फोटो झाले लीक; वादग्रस्त राहिलंय या अभिनेत्रीचं करिअर
टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिचा आज वाढदिवस आहे. ४ मे रोजी अर्थात आज त्रिशा तिचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्रिशा कृष्णनला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचे मेसेजेस येत आहेत. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त आज तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेणार आहोत.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने दिला गोंडस बाळाला जन्म, लग्नाच्या काही वर्षांनी झाले कपल आई- बाबा
४ मे १९८३ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या त्रिशाला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. तमिळ- तेलुगू चित्रपटांतून नाव कमावलेल्या त्रिशाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे कौशल्य चाहत्यांना दाखवले आहे. फक्त व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही तर, वैयक्तिक आयुष्यामुळेही त्रिशा कमालीची चर्चेत आली आहे. तिचा साखरपुडा मोडण्यापासून ते तिचे खाजगी फोटो लीक होण्यापर्यंत आणि विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडण्यापर्यंत त्रिशा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत राहिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात ‘अबीर गुलाल’वर बंदी, वाणी कपूरने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
त्रिशाचे सर्वात पहिले अफेअर विजय थलापतीसोबत होते. २००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘घिल्ली’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. त्या चित्रपटाच्या शुटिंगपासूनच त्यांच्या दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या. नात्याच्या अफवा पसरु लागल्यामुळे विजयचे वैवाहिक जीवन धोक्यात आले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते कधीच स्वीकारले नव्हते. यानंतर त्रिशाचं नाव बाहुबली फेम राणा दग्गुबतीसोबत जोडले गेले. राणा दुग्गुबाती आणि त्रिशा काही वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. याचा खुलासा खुद्द राणा डग्गुबतीने कॉफी विथ करणमध्ये केला होता. जेव्हा ते रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा त्यांच्या दोघांचेही सोशल मीडियावर इंटिमेट्स फोटोज् व्हायरल झाले होते.
‘आतली बातमी फुटली’मध्ये विजय निकम साकारणार भाई; लूकने वेधलं लक्ष
राणा दुग्गुबाती आणि त्रिशाच्या इंटिमेंट फोटोंनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर, त्रिशाने डिसेंबर 2015 मध्ये सर्वांना आश्चर्यचकित केले. बिझनेसमन वरुण मनियानसोबत साखरपुडा करत तिने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्रिशा आणि वरुणच्या साखरपुड्याला दोघांचेही जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. पण, काही महिन्यातच दोघांचा साखपुडा मोडला. धनुषमुळे त्रिशाची एंगेजमेंट तुटल्याचे बोलले जात आहे. त्रिशा आणि वरुणची जेव्हा एंगेजमेंट झाली तेव्हा धनुष आणि वरुणचे संबंध चांगले नव्हते. जेव्हा वरुणने हे समोर आणले तेव्हा त्रिशाचा संयम सुटला आणि यावरून दोघांमध्ये त्यांच्या एंगेजमेंट पार्टीतच वाद झाला. तेव्हापासून ते आजवर त्रिशा एकटेच आयुष्य जगतेय.
एजाज खानच्या अडचणी वाढल्या! ‘हाउस अरेस्ट शो’ प्रकरणी FIR दाखल
त्रिशा शेवटची ऐश्वर्या राय बच्चनच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या कामाचे देशभरातील चाहते मोठ्या प्रमाणावर कौतुक करताना दिसत आहे.