मुंबई : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील आई कुठे काय करते, (aai kuthe kay karte) ही मालिका सध्या टीआरपीमध्ये नंबर वन वर आहे . या मालिकेतील अरुंधतीची (arundhati) भूमिका प्रेक्षकांना खूपच भावतेय. पण गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत अरुंधती दिसत नाहीए. त्यामुळे अरुंधतीने मालिकेतून ब्रेक घेतल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आपली लाडकी अरुंधती न दिसल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. पण नाराज प्रेक्षकांसाठी एक गुड न्यूज आम्ही आणली आहे. अरुंधती लवकरच या मालिकेत दिसणार आहे. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी गोखले प्रभुलकर (madhurani gokhale prabhulkar) हिची तब्बेत ठिक नसल्यामुळे तिने काही दिवस चित्रीकरणातून सुट्टी घेतली आहे. त्यामुळे ती मालिकेच्या भागांमध्ये दिसत नाहीये. पण लवकरच ती मालिकेत परतणार असल्याचं बोललं जातंय.