फोटो सौजन्य: iStock
केंद्र सरकार वाहनांवरील GST कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे नवीन कार खरेदी करताना अशातच, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज घोषणा केली की, कंपनी ग्राहकांना नुकतेच जाहीर करण्यात आालेल्या जीएसटी दरामधील कपातीचे संपूर्ण फायदे देणार आहे. सुधारित किमती २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील.
ही घोषणा करत सेल्स-सर्विस-युज्ड कार बिझनेस अँड प्रॉफिट एन्हान्समेंटचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, ”आम्ही या महत्त्वपूर्ण सुधारणेसाठी भारत सरकारचे मनापासून आभार व्यक्त करतो. यामुळे ग्राहकांसाठी किफायतशीरपणामध्ये वाढ झाली असून ऑटो क्षेत्रात एकूणच आत्मविश्वास देखील वाढला आहे. सणासुदीच्या काळापूर्वी आम्हाला अपेक्षा आहे की हा पुढाकार उत्तम गतीसोबत मागणीला देखील आणखी चालना देईल.
GST कमी होताच Tata Motors ॲक्शन मोडमध्ये, आता ग्राहकांना मिळणार…
पारदर्शक व ग्राहक-केंद्रित कंपनी म्हणून आम्हाला ग्राहकांना हे फायदे देण्याचा आनंद होत आहे. आम्ही जागतिक दर्जाचे गतीशीलता सोल्यूशन्स अधिक सहजसाध्य करण्याप्रती कटिबद्ध आहोत आणि अशा सुधारणांचे स्वागत करतो, जे मागणीला गती देतील, सर्वांसाठी गतीशीलता उपलब्ध करून देतील आणि ग्राहकांना आनंदित करतील, तसेच भारताच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाप्रती योगदान देखील देतील.”
टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने वाहनांच्या किंमतीत मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे ग्राहकांची तब्बल लाखोंची बचत होणार आहे. विविध मॉडेल्समध्ये होणाऱ्या संभाव्य किंमत कपातीमध्ये Glanza वर जवळपास 85,300 रुपये, Taiser वर 1,11,100 रुपये, Rumion वर 48,700 रुपये, Hyryder वर 65,400 रुपये, तर Crysta वर तब्बल 1,80,600 रुपये इतकी बचत होईल. त्याचप्रमाणे HyCross वर 1,15,800 रुपये, Fortuner वर तब्बल 3,49,000 रुपये, Legender वर 3,34,000 रुपये, Hilux वर 2,52,700 रुपये, Camry वर 1,01,800 रुपये, आणि Vellfire वर तब्बल 2,78,000 रुपये इतकी किंमत कमी होणार आहे. या कपातीमुळे टोयोटाच्या लोकप्रिय कार्स आणि एसयूव्ही अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहेत.