Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक (Photo Credit- x)
भारतातील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन झाकीर खान (Zakir Khan) आता स्टँडअप स्टेज शोमधून काही काळासाठी ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. खराब आरोग्यामुळे त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी काम सुरू ठेवले होते, मात्र आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
झाकीर खान यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले की, “गेल्या अनेक वर्षांपासून मी सतत दौरे करत आहे. सतत शो करणे आरोग्यासाठी आणि माझ्यासाठीही चांगले नाही. दिवसातून २ ते ३ शो, रात्रीची अपुरी झोप, सकाळी लवकर फ्लाइट्स आणि जेवणाची निश्चित वेळ नाही. आता डॉक्टरांनी ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे. माझे मन तयार नाही, पण आता स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे वाटत आहे. त्यामुळे, भारतात मी फक्त काही निवडक शहरांमध्येच शो करणार आहे.”
Stand up comedian #ZakirKhan takes a step back from touring due to health concerns
After a decade of sleepless nights & nonstop shows, the comedian says it’s time to prioritise well-being.#ZakirKhan #HealthUpdate #StandUpComedy #Wellness #Healthcare pic.twitter.com/MicLQXgDHf— BombayTimes (@bombaytimes) September 7, 2025
झाकीर खान म्हणाले की, त्यांना लाइव्ह परफॉर्म करायला खूप आवडते, पण आता आरोग्यामुळे ब्रेक घेणे आवश्यक आहे. तो म्हणाले की, तो गेल्या एक वर्षापासून त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत, पण आता त्याला वाटते की वेळेवर स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
२०१२ मध्ये कॉमेडी सेंट्रलवरील ‘भारताचा सर्वोत्कृष्ट स्टँडअप कॉमेडियन’ हा किताब जिंकून झाकीर खान प्रसिद्धीझोतात आला. तो त्यांच्या विनोदी व्हिडिओ आणि स्टँडअप शोसाठी खूप लोकप्रिय आहे. त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘हक से सिंगल’, ‘कक्षा ग्यारहवी’, ‘तथास्तु’ आणि ‘मनपसंद’ सारखे लोकप्रिय शो केले. ‘चाचा विधायक हैं हमारे’ या वेब सिरीजच्या तिसऱ्या सीझनमध्येही तो दिसला होता. अलीकडेच त्याने अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे परफॉर्म करून इतिहास रचला होता. स्टँडिंग ओव्हेशन मिळवणारा तो पहिले भारतीय स्टँडअप कॉमेडियन ठरला आहे.