Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बंजारा’ सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट…

परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 01, 2025 | 03:15 PM
'बंजारा' सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट…

'बंजारा' सिनेमाची रिलीज होण्याआधीच चर्चा, सिक्कीममध्ये चित्रित होणारा पहिला भारतीय चित्रपट…

Follow Us
Close
Follow Us:

परदेशात चित्रीकरण करणे हे मराठी सिनेसृष्टीसाठी आता काही नवीन राहिलेले नाही. परंतु भारतातीलच एक असे ठिकाण जे समुद्रसपाटीपासून हजारो फूट उंच, ऑक्सिजन पातळी अगदी कमी, जिथे हवामान कधी बदलेल याचा नेम नाही, अशा जिकरीच्या ठिकाणी शुटिंग करणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. हे ठिकाण आहे भारताच्या ईशान्य भागातील सिक्कीम हे राज्य. स्नेह पोंक्षे दिग्दर्शित ‘बंजारा’ या मराठी चित्रपटाची शुटिंग ह्या निसर्गरम्य ठिकाणी झाली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर रंगणार हास्याची इनिंग, ‘पत्रापत्री’मध्ये होणार IPL चा जल्लोष…

त्यामुळे ‘बंजारा’ हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे, ज्याची शुटिंग सिक्कीम मध्ये झाली आहे. यापूर्वी ‘बंजारा’ चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात सिक्कीमचे मनमोहक सौंदर्य आणि मित्रांची बाईक राईड बघून अनेकांना खूप छान वाटले असेल. हे रुपेरी पडद्यावर पाहायला जितके सहज आणि सुंदर दिसते तितकंच त्याचं शुटिंग करताना प्रचंड आव्हानात्मक होते. याबाबतचा अनुभव चित्रपटाचे दिग्दर्शक स्नेह पोंक्षे यांनी शेअर केला आहे.

 

मलायका अरोराच्या घरात कात्री घेऊन घुसलेली महिला फॅन, अभिनेत्रीने सांगितला ‘त्या’ रात्रीचा भयानक अनुभव

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, “हे एक असे चित्रीकरण स्थळ आहे, जिथे आजवर कोणत्याच चित्रपटाचे चित्रीकरण झालेले नाही. ही जागाच अशी आहे, की कोणालाही प्रेमात पाडेल. आम्ही सुमारे १४, ८०० फूट उंचीवर चित्रीकरण केले आहे, जिथे खूप कमी ऑक्सिजन होता. आम्ही अक्षरशः ऑक्सिजन स्प्रे व कपूर वापरत होतो. एकतर हवामानाचा काहीच अंदाज नाही. क्षणात उजाडलेले असायचे तर क्षणात पाऊस यायचा. आमचे नऊ दिवसांचे शेड्यूल होते आणि या काळात बराच पाऊस पडला. शेड्यूल बदलू शकत नसल्याने कसंबसं शूटिंग पूर्ण केले. सुमारे दीडशेची टीम घेऊन आम्ही तिथे गेलो होतो आणि तिथली जवळपास शंभरच्यावर लोकं होती. अशा सगळ्यांना सेटवर घेऊन आम्ही त्या अनपेक्षित हवामानात चित्रीकरण पूर्ण केले. या सगळ्यासाठी आम्हाला इंडियन आर्मीचे खूप सहकार्य लाभले.”

सलमान खानच्या ‘सिकंदर’ची निराशजनक कमाई, बॉक्स ऑफिसवर २ दिवसांत कमावले फक्त…; एकूण कलेक्शन किती?

मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वी. एस. प्रॉडक्शन्स आणि मोरया प्रॉडक्शन्स सादर करत असणाऱ्या या चित्रपटाची कथा, पटकथा, लेखन स्नेह पोंक्षे यानेच केले असून या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Web Title: Banjara marathi movie becomes the first indian film to be shot in sikkim creates new history by shooting at an altitude of 14800 feet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड
1

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
2

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
3

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

Movie Collection: बजेट पेक्षा जास्त ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाची कमाई, चाहत्यांचा मिळाला भावुक प्रतिसाद
4

Movie Collection: बजेट पेक्षा जास्त ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाची कमाई, चाहत्यांचा मिळाला भावुक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.