फोटो सौजन्य - JioHotstar Reality
‘बिग बॉस १९’ च्या आगामी भागांमध्ये धमाकेदार ट्विस्ट आणि हाय-व्होल्टेज ड्रामा असेल. हा ट्विस्ट संपूर्ण खेळाची दिशा बदलून टाकेल. खरंतर, आठवड्याच्या मध्यात झालेल्या बेदखलीत, घरातील सदस्यांनी फरहाना भट्टला बाहेर काढले होते. पण तिला थेट बाहेर काढण्याऐवजी, बिग बॉसने तिला गुप्त खोलीत ठेवले आणि इतर स्पर्धकांना त्याची माहितीही दिली नाही. कलर्स टीव्हीने सोशल मीडियावर एक नवा प्रोमो शेयर केला आहे. कालच्या भागांमध्ये बिग बॉसला तीन पहिल्या कर्णधारासाठी दावेदार मिळाले आहेत.
पहिल्या बिग बॉसच्या कर्णधार पदासाठी पात्र ठरलेले आहे अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि कुचिका सदानंद यांच्यामध्ये कर्णधार पदासाठी लढत सुरू झाली आहे. कालच्या भागांमध्ये अभिषेक बजाज आणि बशीर अली या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण पाहायला मिळाले. आता नव्या प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये हे भांडण आता हाणामारी पर्यंत पोहोचले आहे. अभिषेक बजाज हा प्रोमो मध्ये बशीर अलीने त्याला लाथ मारण्याचा आरोप करताना दिसत आहे.
आता पुढे भागामध्ये काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉस बसिर अलीने जर अभिषेक बजाजला लाथ मारली असल्यास कोणती शिक्षा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस १९ ची थीम लोकशाहीभोवती आधारित होती. या थीमवरून हे स्पष्ट होते की यावेळी घरातील सदस्य त्यांच्या परस्पर समजुतीने आणि संमतीने घर चालवतील. ते स्वतःला नामांकित करतील आणि स्वतः कोणाला तरी कॅप्टन म्हणून निवडतील.
Bigg Boss ka captaincy task shuru hua with a lot of heat, kiss gharwaale ki hogi iss mein jeet? 🤔
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.
Watch Now: https://t.co/wpGGfH0z0T pic.twitter.com/2YBQTQHXbD
— JioHotstar Reality (@HotstarReality) August 29, 2025
बिग बॉस सुरू होऊन ३ दिवस झाले आहेत. पण कॅप्टन म्हणून कोणालाही निवडण्यात आले नाही. पण द खबरीच्या ट्विटनुसार, बिग बॉसला आता या सीझनचा पहिला कॅप्टन मिळाला आहे. माहितीनुसार, कुनिका सदानंद ही पहिली लीडर म्हणून दिसणार आहे. लाईव्ह फीड अपडेट्सच्या ट्विट्सनुसार, कर्णधारपदासाठीची ही स्पर्धा अशनूर, कुनिका आणि अभिषेक यांच्यात होती, ज्यासाठी प्रत्येकाला एक निश्चित कार्य पूर्ण करायचे होते. हे कार्य करण्यासाठी, स्पर्धक स्वतःसाठी एक पर्याय देखील निवडू शकत होते.
ज्यामध्ये, अशनूरने झीशानला तिचा पर्याय म्हणून निवडले आणि कुनिकाने तिचे कार्य करण्यासाठी बसीरला तिचा पर्याय म्हणून निवडले. आता आपण तुम्हाला सांगूया की त्यांना कार्य म्हणून कोणते काम देण्यात आले होते. तर या स्पर्धकांना घराच्या टाइल्स रंगवण्याचे काम देण्यात आले.