Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२० कोटींचे भव्य सेट, ३० किलोचा लेहेंगा! २४ वर्षांपूर्वी आलेल्या ‘या’ चित्रपटाने बदललं बॉलिवूडचं चित्र; आजही जादू कायम

संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण. ५० कोटींचे बजेट, २० कोटींचे भव्य सेट, माधुरी दीक्षितचा ३० किलोचा लेहेंगा आणि अनेक रंजक किस्से जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 03:43 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतीय चित्रपटसृष्टीत जेव्हा भव्य चित्रपटांचा विषय निघतो, तेव्हा संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’चं नाव आवर्जून घेतलं जातं. १२ जुलै २००२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर कलात्मक मांडणी, सेट्स, वेशभूषा आणि संगीताच्या बाबतीतही नवा मापदंड निर्माण केला. प्रदर्शनाला २४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या चित्रपटामागील काही रंजक गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

त्या काळात ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘देवदास’ हा भारतातील सर्वाधिक खर्चिक चित्रपट मानला जात होता. विशेष म्हणजे, चित्रपटासाठी उभारण्यात आलेल्या भव्य सेट्सवरच जवळपास २० कोटी रुपये खर्च करण्यात आले. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी तयार केलेले राजेशाही सेट आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहेत.

चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषेवरही तितकीच मेहनत घेण्यात आली होती. ‘पारो’च्या भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनच्या साड्या खास कोलकात्यातून मागवण्यात आल्या होत्या. तर ‘चंद्रमुखी’च्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितने परिधान केलेला प्रसिद्ध लेहेंगा तब्बल ३० किलो वजनाचा होता. नृत्य करताना अडचणी येत असल्याने त्याचे वजन नंतर 16 किलो करण्यात आले.

Sameer Paranjape : अभिनेत्याची उंच झेप! ‘या’ मालिकेत गाजलेला पठ्ठया आता हॉटेल मालक, सुरु केला नवीन व्यवसाय

चित्रपटातील प्रत्येक फ्रेम चित्रासारखे दिसावे, यासाठी प्रकाशयोजना आणि छायांकनावरही विशेष लक्ष देण्यात आले. काही दृश्यांच्या चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर जनरेटर्सचा वापर करण्यात आला होता. शूटिंगदरम्यान सेटवर आग लागण्याच्या दुर्घटनाही घडल्या, ज्यात काही क्रू सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रभावी अभिनयामुळे ‘देवदास’ आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या चित्रपटाची भव्यता, गाणी आणि संवाद प्रेक्षकांच्या मनात तितक्याच ताकदीने जिवंत आहेत.

‘ब्लँकेटच्या आतून स्पर्श…,’१३ व्या वर्षी राम कपूरबरोबर शाळेत घडलेलं असं काही की…, अभिनेता खुलासा करत म्हणाला, ‘आणखी स्पर्श..’

Web Title: 24 years of devdas 20 crore sets a 30 kg lehenga sanjay leela bhansalis classic still captivates audiences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 03:43 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • bollywood movies
  • madhuri dixit

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.