Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इमरान हाश्मीच्या ‘Awarapan 2’चं पहिलं गाणं ‘जुनून’ प्रदर्शित, अभिजीत सावंतच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मनं

इमरान हाश्मीच्या 'आवारापन २' चित्रपटातील पहिलं गाणं 'जुनून' रिलीज झालं आहे. अभिजीत सावंतचा आवाज, मिथूनचं संगीत आणि दिशा पटानीची झलक चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 12:59 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अभिनेता इमरान हाश्मीच्या बहुप्रतीक्षित ‘आवारापन २’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर आणि टीझर रिलीज झाल्यानंतर आता निर्मात्यांनी या सिनेमातील पहिलं गाणं ‘जुनून’ प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, चाहत्यांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

स्पेशल फिल्म्सने नुकताच ‘आवारापन २’चा टीझर रिलीज करून चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. त्यानंतर आता चित्रपटातील पहिलं गाणं ‘जुनून’ रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला अभिजीत सावंत यांनी आवाज दिला असून, संगीतकार मिथून यांनी सुरेल संगीत दिलं आहे. गीतकार शाहिद कादरी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. भावपूर्ण शब्द, संगीत आणि अभिजीत सावंत यांच्या दमदार गायकीमुळे हे गाणं प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

या गाण्यात इमरान हाश्मी, दिशा पटानी आणि श्रेया सरन यांची खास झलक पाहायला मिळते. इमरानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे गाणं शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “इस आवारापन के जुनून में होना है.” या पोस्टलाही चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.


‘आवारापन २’मध्ये इमरान हाश्मीसोबत अभिनेत्री दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचीही दमदार झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे, त्या या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या नव्या अवताराने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘माझ्या नवऱ्याचे ५० अफेअर्स असले तरी…’; शिल्पा शिंदेवर भडकली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, ‘लॉकअप २’मध्ये रंगला मोठा वाद

नितीन कक्कर दिग्दर्शित ‘आवारापन २’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. टीझरनंतर आता पहिल्या गाण्यालाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

Web Title: Emraan hashmis awarapan 2 first song junoon released abhijeet sawants soulful voice wins fans hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • abhijeet sawant
  • bollywood movies
  • Emraan Hashmi
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
1

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज
3

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत
4

Ramayana Movie New Poster : रणबीर कपूरच्या ‘राम’ रूपाची नवी झलक! अरुण गोविल साकारणार राजा दशरथ, ‘रामायणम्’चे पोस्टर्स चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.