(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गेल्या काही वर्षात अभिनेता स्वप्नील जोशी त्याचा वैविध्यपूर्ण भूमिका आणि कामामधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसतोय पण या भूमिका साकारताना तो विशेष त्याचा लूक्स आणि रोल्स बद्दल देखील तितकाच विचार करतो आणि त्या साकारतो. ‘रणांगण’, ‘समांतर’, ‘वाळवी’ आणि मागच्या वर्षी प्रदर्शित झालेले ‘नवरा माझा नवसाचा २’ आणि ‘बाई गं’ तसेच आता या वर्षी प्रदर्शित झालेला ‘जिलबी’ प्रत्येक चित्रपटात स्वप्नील त्याचा नवख्या भूमिकेत बघायला मिळत आहे. आणि तो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. स्वप्नील च्या आजवरच्या प्रत्येक भूमिका तितक्याच ताकदीच्या होत्या यात शंकाच नाही. आणि प्रेक्षकांना त्या खूप आवडल्या देखील.
शिवानी-अंबर विवाह बंधनात; अनेक मराठी कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला लग्न सोहळा
स्वप्नीलने त्याची प्रत्येक भूमिका साकारताना त्यातलं वेगळेपणं जपलं आणि प्रेक्षकांना देखील ते भावल आणि म्हणून प्रेक्षक-समीक्षकानी त्याचा प्रत्येक भूमिकेवर तेवढंच प्रेम केलं आहे. चित्रपटाच्या अनोख्या कथा आणि स्वप्नील्याच्या भूमिकांच अचूक टाय मिंग हे नेहमीच लक्षवेधी ठरत आले आहे. स्वप्नील येणारी प्रत्येक भूमिका अगदीच चोखपणे बजावतो आणि म्हणून २०२५ वर्षात स्वप्नील अजून कमालीचे प्रोजेक्ट्स करणार आहे. आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन देखील करणार आहे.
“शुभचिंतक” नावाच्या गुजराती चित्रपटामध्ये स्वप्नील पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. अभिनेत्याच्या अपवादात्मक अभिनय पराक्रमासाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारतो यात शंका नाही. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आले आहे.
सैफच्या सिक्योरिटीत मोठा बदल, सुरक्षेसाठी ‘या’ अभिनेत्याची फौज 24 तास देणारा पहारा?
स्वप्नील कायम चर्चेत असलेला अभिनेता म्हणून ओळखला जातो आणि अश्यातच पुन्हा एकदा स्वप्नील ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काही दिवसापूर्वी स्वप्नीलने निर्माता म्हणून अजून एका चित्रपटाची घोषणा केली असून “सुशीला- सुजीत” हा नवा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आगामी “सुशीला सुजीत” या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशी करणार आहे. स्वप्नीलच्या सोबतीने अभिनेता प्रसाद- मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी देखील या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.