राजा राणीची गं जोडी या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवानी सोनार लग्नबंधनात अडकली आहे. तिने अभिनेता अंबर गणपुळे याच्याशी विवाहगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. अखेर, २१ जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर दोघांनी एकत्ररित्या नव्या आयुष्यात सुरवात केली आहे. या सुंदर आणि गोड क्षणांचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चला तर मग या गोड क्षणांचे फोटोज पाहुयात. (फोटो सौजन्य - Social Media)
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली आहे. तसेच अनेक जणांनी हे गोड क्षण टिपून आपल्या चाहत्यांना गोड बातमी देण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे.
अभिनेत्री रेशमा शिंदेने या क्षणांचे काही छायाचित्र तिच्या @reshmashinde02 या ऑफिशिअल इंस्टाग्राम हॅन्डलवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये 'रंग माझा वेगळा' या कार्यक्रमातील काही कलाकार मंडळीही दिसून येत आहेत.
विशेष बाब म्हणजे 'रंग माझा वेगळा' या टीमने अगदी काहीच दिवसांपूर्वी या नवं वधू वराचा केळवण सोहळा पार पडला होता. या कार्यक्रमाचे छायाचित्र सोशल मीडियावर फार प्रसिद्ध झाले होते.
गेल्यावर्षी शिवानी आणि अंबरचा साखरपुडा पार पडला होता. गुढीपाडव्याच्या शुभ दिनी दोघांनी साखरपुडा हुरकला होता.
लग्नात शिवानी आणि अंबरने मराठमोळा लुक केला आहे. गेल्या काही दिवस त्यांनी त्यांची हळद, संगीत तसेच मेहंदी या सर्व कार्यक्रमांचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.