Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhooth Bangla चा भन्नाट पोस्टर रिलीज; झाडावर उलटे लटकलेल्या अक्षयच्या लूकने वाढवला सस्पेन्स!

अक्षय कुमारचा 'भूत बांगला' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे, अशातच या चित्रपटाचे आणखी एक आकर्षित पोस्टर रिलीज झाले आहे. जे पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2026 | 12:42 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Bhooth Bangla चा भन्नाट पोस्टर रिलीज
  • झाडावर उलटे लटकला अक्षय कुमार
  • नव्या पोस्टरने वाढवला सस्पेन्स
 

बालाजी मोशन पिक्चर्सने त्यांच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बांगला’ चा एक नवीन आणि हटके पोस्टर प्रेक्षकांसमोर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये सुपरस्टार अक्षय कुमार अतिशय वेगळ्या अंदाजात दिसत असून त्यांची अनोखी पोझ आणि एक्सप्रेशन पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे पोस्टर पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.

मनोरंजन विश्वात शोककळा; प्राजक्ता माळीच्या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफरने वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पोस्टरमध्ये अक्षय कुमार झाडाच्या फांदीवर उलट लटकलेला दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावर मजेदार पण थोडासा भीतीदायक असे एक्सप्रेशन दिसून येत आहे, ज्यात खोडकरपणा आणि वेडेपणाची झलक स्पष्टपणे जाणवत आहे. पोस्टरच्या पार्श्वभूमीला भयावह जंगल दाखवण्यात आले आहे आणि त्यांच्या भोवती वटवाघुळे उडताना दिसत आहे. या संपूर्ण दृश्यामुळे पोस्टरला एक रहस्यमय आणि भयानक ट्विस्ट मिळाला आहे. या अनोख्या पोस्टरमुळे चित्रपटात सुपरनॅचरल थरार आणि कॉमेडीचा भन्नाट संयोजन पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

या चित्रपटाचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची पुन्हा एकदा एकत्र आलेली जोडी. या जोडीने यापूर्वीही अनेक सुपरहिट कॉमेडी चित्रपट दिले आहेत, जे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यामुळे ‘भूत बंगला’बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. उत्कृष्ट कॉमिक टाइमिंग आणि मनोरंजक कथानकासाठी ओळखली जाणारी ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘जिवंत जाळण्याची दिली धमकी…’ अनुराग डोभालचा पर्दाफाश; पेड PR असल्याचा भावाने केले गंभीर आरोप

‘भूत बांगला’ हा चित्रपट बालाजी मोशन पिक्चर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांच्या बॅनरखाली तयार होत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Web Title: Akshay kumar bhooth bangla new poster priyadarshan horror comedy film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.